Syed Mushtaq Ali Trophy : अजिंक्य रहाणेची स्फोटक खेळी, मुंबई फायनलमध्ये

बंगळुरू : सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२४ चा पहिला उपांत्य सामना १३ डिसेंबर रोजी खेळला गेला. हा उपांत्य सामना बडोदा आणि मुंबई यांच्यात पार पडला, जो बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला गेला. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२४ च्या उपांत्य फेरीत मुंबईने दमदार कामगिरी करत बडोद्याला ६ विकेट्सने पराभूत करून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. जिथे अजिंक्य रहाणेच्या ९८ धावांच्या खेळीने मुंबईच्या विजयाची कहाणी लिहिली. रहाणेच्या या खेळीने मुंबईला अंतिम फेरीत नेले.


या सामन्यात कृणाल पांड्याच्या नेतृत्वाखाली बडोदा संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ७ गडी गमावून १५८ धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबई संघाने केवळ ४ गडी गमावून १६ चेंडू बाकी (17.2 षटक) असताना १६४ धावा करत सामना जिंकला.मुंबईच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली, ज्यात सूर्यांश शेडगेने 2 षटकात केवळ ११ धावा देत २ महत्त्वाचे बळी घेतले. त्याचवेळी तनुष कोटियन आणि मोहित अवस्थी यांनीही प्रत्येकी एक विकेट घेतली.विशेष म्हणजे मुंबईच्या या विजयाचा हिरो 36 वर्षीय अजिंक्य रहाणे ठरला.उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यातही या भारतीय फलंदाजाने शानदार फलंदाजी करत ८४ धावांची शानदार खेळी केली होती. मुंबईकडून खेळणाऱ्या अजिंक्य रहाणेने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या चालू हंगामात 8 सामन्यांमध्ये 432 हून अधिक धावा केल्या आहेत.


१५८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात संथ झाली होती, मात्र कर्णधार अजिंक्य रहाणे आणि श्रेयस अय्यर या जोडीने शानदार भागीदारी करत सामना बडोद्याच्या पकडीपासून दूर नेला. अजिंक्य रहाणेला रोखण्यात बडोदा संघ पूर्णपणे अपयशी ठरला. अजिंक्य रहाणेने १७५ च्या स्ट्राईक रेटने ५६ चेंडूत १० चौकार आणि ४ षटकारांसह ९८ धावांची नाबाद खेळी खेळली. रहाणेसह श्रेयस अय्यरने ३० चेंडूत ४६ धावा करत संघाला मजबूत स्थितीत आणले. बडोद्याच्या गोलंदाजांमध्ये हार्दिक पंड्या, अभिमन्यू सिंग राजपूत आणि शाश्वत रावत यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली, पण ते मुंबईच्या फलंदाजीला रोखण्यात अपयशी ठरले आहे. मुंबईने अंतिम फेरीत धडक मारली असून आता त्यांच्या नजरा विजेतेपदावर असणार आहेत.

Comments
Add Comment

बुमराह परतणार पण अक्षर पटेल नाही खेळणार, टीम इंडिया चिंतेत

धरमशाला : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच टी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेत भारताने २-१ अशी आघाडी घेतली. धरमशाला

फक्त ९५ चेंडूत १७१ धावा करणारा वैभव आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकणार नाही

मुंबई : भारताच्या वैभव सूर्यवंशीने १९ वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेत यूएई विरुद्ध ९५ चेंडूत १७१ धावा केल्या. ही

धरमशाला टी ट्वेंटी सामन्यात भारताचा विजय, मालिकेत घेतली आघाडी

धरमशाला : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच टी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेत भारताने २-१ अशी आघाडी घेतली. धरमशाला

फुटबॉलच्या २०३४च्या विश्वचषकासाठी 'प्रोजेक्ट महादेवा' मधून गुणवान खेळाडू मिळतील : मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जागतिक फुटबॉलपट्टू लिओनेल मेस्सी यांच्या हस्ते प्रोजेक्ट महादेवा'चा

भारत जिंकला, टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर पाकिस्तानने टेकले गुडघे!

दुबई : १९ वर्षांखालील आशिया कप २०२५ स्पर्धेत भारतीय युवा संघाने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध आपला दबदबा

दुबईत आज भारत-पाक हाय व्होल्टेज सामना

शतकवीर वैभव सूर्यवंशीवर क्रिकेट चाहत्यांचे लक्ष दुबई : १९ वर्षांखालील आशिया चषक २०२५ क्रिकेट स्पर्धेत भारतीय