२५ वर्षे वय असेल तरच मिळणार दारू, दिल्ली सरकारचे आदेश

नवी दिल्ली : तरुणांमध्ये वाढत चाललेले मद्यपानाचे प्रमाण पाहता दिल्ली सरकारने मद्यपानाचे वय निश्चित केले आहे. यापुढे २५ वर्ष आणि त्यावरील लोकांनाच मद्यपान करता येणार आहे. तसेच मद्यपानासाठी मद्यपींना वय नमूद असलेले ओळखपत्र किंवा पुरावा द्यावा लागणार आहे. दिल्ली सरकारने हॉटेल, क्लब, रेस्टॉरंट, परमिट रूमधारकांसाठी निर्देश जारी केले आहेत.


दिल्लीतील उत्पादन शुल्क खात्याला नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले होते. अल्पवयीन मुलेही मद्यपान करीत असल्यामुळे वयाची अट निश्चित करण्यात आली आहे. मद्यपींना ओळखपत्र दाखविल्याशिवाय दिल्लीमध्ये मद्यपान करण्यास परवानगी मिळणार नाही. अल्पवयीन अथवा २५ वर्षांच्या आतील मुलांना मद्यविक्री केल्यास परवाना रद्द करण्यात येणार आहे. परवानाधारक अथवा त्यांच्या कर्मचार्‍यांना नव्या अटींचे पालन करावे लागणार आहे. दिल्लीतील सर्व हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमध्ये दिल्ली सरकारने परिपत्रक धाडले आहे.


उत्पादन शुल्क खात्याने वयाची खातरजमा करण्यासाठी मद्यविक्री परवानधारकांसाठी नवीन अ‍ॅप सुरू केले आहे. डीजीलॉकर अ‍ॅपद्वारे परवानाधारकांना मद्यपींच्या वयाची खातरजमा करता येणार आहे. भौतिक आयडीचा वापर केल्यानंतर मद्यपीचे वय २५ वर्षांपेक्षा जादा आहे की लहान हे समजण्यास मदत होणार आहे.


मद्यसेवनासाठी २१ व २५ वयाची अट ठेवण्यात आली आहे. त्यानुसार सौम्य क्षमतेचे मद्यसेवन करण्यासाठी २१ वय पूर्ण असणे आवश्यक आहे. तर 'हार्ड ड्रिंक' करण्यासाठी २५ वय पूर्ण असणे आवश्यक आहे. तसेच मद्य वाहतुकीसाठीही हाच नियम लागू आहे. कायद्यानुसार, महाराष्ट्रात दारू खरेदी करण्यासाठी, बाळगण्यासाठी, वाहतूक करण्यासाठी किंवा सेवन करण्यासाठी मद्य परमिट आवश्यक आहे. तसेच २५ वर्षांपेक्षा जास्त वयाची कोणतीही व्यक्ती त्याच्या आरोग्याची जपणूक आणि देखभाल करण्यासाठी मद्य परमिट मिळविण्यास पात्र आहे. परवानाशिवाय मद्य खरेदी करणे, सेवन करणे हा 'बॉम्बे प्रोहिबिशन ॲक्ट, १९४९ अंतर्गत गुन्हा आहे.

Comments
Add Comment

बिहारमध्ये राजदने राहुल गांधींना बनवलं उल्लू

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. पण बिहारसाठी राजकीय पक्षांचा प्रचार हळू

पीएच. डी. शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू

लखनऊ (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातील प्रख्यात बनारस हिंदू विद्यापीठात शिकणाऱ्या २७ वर्षीय परदेशी

फटाकेबंदीबाबत देशव्यापी धोरण आखा

सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला सूचना नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली-राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातच

वर्गमित्रांनीच ८ विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत टाकले फेविक्विक

भुवनेश्वर (वृत्तसंस्था) : ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यातील फिरिंगिया ब्लॉकमधील सलागुडा येथील सेवाश्रम शाळेत सर्व

भारत सर्वाधिक लठ्ठ मुलांचा देश : युनिसेफ

खाद्यपदार्थांच्या लेबलमुळे ओळखता येणार पदार्थ नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहा वर्षांत भारत हा जगातील सर्वाधिक

आजारी असल्याने बॉसकडे रजा मागितली आणि १० मिनिटांतच झाला मृत्यू, नेमकं घडलं तरी काय...

नवी दिल्ली: एका कर्मचाऱ्याने त्याच्या बॉसला पाठवलेला मेसेज आणि त्यानंतर १० मिनिटांतच त्याचा झालेला मृत्यू या