
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बांगलादेशमधील हिंदूंवरील अत्याचारावरून (Bangladesh violence) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर पत्रकार परिषद घेत जोरदार हल्लाबोल केला. बांगलादेशमध्ये इस्कॉनच्या प्रमुखाला अटक झाली, तिथे हिंदूंवर अन्याय होताय. विश्वगुरु शांत का आहेत? असे त्यांनी म्हटले होते. आता यावरून भाजप नेत्या नवनीत राणा (Navneet Rana) यांनी उद्धव ठाकरेंवर तिखट शब्दात जोरदार हल्लाबोल केला आहे .
नवनीत राणा म्हणाल्या की, जनाब उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, तेव्हा मी हनुमान चालीसा पठण करणार म्हणून मला १४ दिवस जेलमध्ये ठेवण्यात आले. आमच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तेव्हा उद्धव ठाकरे यांचे हिंदुत्व कुठे गेले होते? आज ते देशाच्या पंतप्रधानांवर बोलत आहेत. जनाब उद्धव ठाकरे तुमची लायकी नाही, देशाच्या पंतप्रधानांवर बोलायची, असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली.

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून भाजपचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर राज्य सरकार स्थापन ...
देशातील पंतप्रधानांना हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही
नवनीत राणा पुढे म्हणाल्या की, बांगलादेश वर जे अत्याचार होत आहेत. यावर संपूर्ण महाराष्ट्रात हिंदू समाजाने मोर्चे काढले, निषेध व्यक्त केला. तेव्हा जनाब उद्धव ठाकरे कुठे होते? तेव्हा हिंदुत्व आठवलं नाही. आज टीका करण्यासाठी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. तुम्ही देशातील पंतप्रधानांना हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही. एका लोकप्रतिनिधीला १४ दिवस जेलमध्ये टाकले, तेव्हा हिंदुत्व कुठे गेले होते? असा सवाल करत नवनीत राणा यांनी उबाठांवर फटकारे लगावले.
तुम्हाला जनतेने घरी बसवलंय
तुम्ही काळजी करू नका. हिंदूंसाठी आमच्यासारखे हिंदू भक्त या मैदानात आहेत. तुम्ही फक्त आराम करा, तुम्हाला आराम करण्यासाठीच आम्ही सोडले आहे, असा टोला देखील नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. फक्त टोमणे मारायचे आणि विरोध करायचा हेच काम तुम्ही केलंय म्हणून आज तुम्हाला जनतेने घरी बसवलंय तेव्हा आता तुम्हाला हिंदुत्व आठवलेय पण विधानसभा निवडणुकीत त्यांना जनतेने चोख उत्तर दिले आहे, असेही त्यांनी म्हटले.