Saturday, January 18, 2025
Homeमहाराष्ट्रठाणेरासायनिक वायू पसरविल्याप्रकरणी कंपनीविरोधात गुन्हा

रासायनिक वायू पसरविल्याप्रकरणी कंपनीविरोधात गुन्हा

बदलापूर : बदलापुरात रासायनिक वायूमुळे रस्त्यावर धुके पसरण्यास व नागरिकांना झालेल्या त्रासास एमआयडीसीतील एका कंपनीचा हलगर्जीपणा कारणीभूत ठरल्याचे समोर आले आहे. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी कंपनीतील टेक्निशियन व सुपरवायजर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. बदलापूर शहराच्या पूर्व भागात खरवई ते शिरगाव औद्योगिक वसाहत पसरली आहे. गेल्या काही वर्षात या औद्योगिक वसाहतीच्या शेजारी मोठ्या प्रमाणावर नागरीकरण झाले आहे. या कंपन्यांमधून अनेकदा रासायनिक वायू सोडण्याच्या तक्रारी आसपासचे रहिवासी करतात. हिवाळ्यात रासायनिक वायूचा हा त्रास अधिक जाणवतो.

सिंधुदुर्गात वाघांची संख्या पोहोचली आठवर

बुधवारी रात्रीही नऊच्या सुमारास खरवई, शिरगाव, दत्तवाडी या औद्योगिक वसाहती शेजारच्या परिसरामध्ये रहिवाशांना डोळे चुरचुरणे आणि श्वसनाचा त्रास जाणवला. तर बदलापूर कर्जत राज्यमार्गावर धुके पसरल्यासारखी परिस्थिती होती. एखाद्या कंपनीने धूर सोडल्याने झाला आहे की वायुगळतीमुळे, हे कळायला मार्ग नव्हता. अखेर एमआयडीसीतील टिनको या कंपनीत दोन कामगार रसायनावर प्रक्रिया करताना नायट्रोजन डायऑक्साईड मोठ्या प्रमाणात तयार होऊन पसरल्याने हा प्रकार झाल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

त्यानुसार पोलिसांनी हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत कंपनीचा टेक्निशियन नित्यानंद बोरा व सुपर वायजर प्रशांत शाहू यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर यांनी
दिली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -