
नवी दिल्ली : सध्या धमकीच्या कॉल्सची (Threat Calls) संख्या सातत्याने वाढत चालली आहे. शाळा, विमानतळ अशा ठिकाणी बॉम्ब ठेवल्याचे किंवा ही ठिकाणे बॉम्बने उडवण्याच्या धमक्या मिळत आहेत. नुकतेच दिल्लीतील शाळांना उडवण्याची धमकी मिळाली होती. अशातच आता आरबीआयलाही धमकीचा मेल (RBI Bomb Threat ) आला आहे.

नवी दिल्ली: दिल्लीच्या अनेक शाळांमध्ये शुक्रवारच्या सकाळी एक धमकीवजा फोन आला. कॉलची माहिती दिल्ली पोलीस आणि अग्निशमन दलाला देण्यात आली. यानंतर लगेचच ...
रशियन भाचेत काल दुपारच्या सुमारास आरबीआयच्या अधिकृत वेबसाईटवर स्फोटकांनी उडवण्याच धमकीचा मेल आला. धमकीचा मेल येताच पोलीस प्रशासन अॅक्शन मोडवर आले असून याप्रकरणी माता रमाबाई मार्ग (एमआरए मार्ग) पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, गेल्या महिन्यातही आरबीआयला धमकी मिळाली होती. मात्र सातत्याने वाढत चाललेल्या धमक्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आले आहे. (RBI Bomb Threat)