Monday, June 30, 2025

BJP Meeting Update: शहा, नड्डांच्या उपस्थितीत भाजपाचे १२ जानेवारीला शिर्डीत संमेलन होणार

BJP Meeting Update: शहा, नड्डांच्या उपस्थितीत भाजपाचे १२ जानेवारीला शिर्डीत संमेलन होणार

मुंबई: सत्ताधारी महायुतीला विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळाल्यानंतर, महाराष्ट्र प्रदेश भाजपाने शिर्डी येथे मेळाव्याचे आयोजन केले आहे.


१२ जानेवारीला स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त स्वामी विवेकानंद यांच्या विचारांवर आधारित हे अधिवेशन असेल. स्वामी विवेकानंद यांच्या विचारांनुसार युवकांना प्रेरित करून भाजपाकडे आकर्षित करण्यासाठी या वेळी नवीन अभियानाची सुरुवात होणार आहे.



अहिल्यानगर जिल्ह्यातील मुंबईपासून सुमारे २४० किमी अंतरावर असलेल्या शिर्डी येथे दिवसभर चालणाऱ्या या मेळाव्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह १० हजाराहून अधिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत, असे पक्षाच्या निवेदनात शुक्रवारी म्हटले आहे.


स्वामी विवेकानंदांच्या विचारसरणीपासून प्रेरणा घेऊन या संमेलनात तरुणांना लक्ष्य करून एक नवीन मोहीम सुरू केली जाईल. हे या संमेलनामागचे उद्दिष्टे आहे.


Comments
Add Comment