Saturday, January 18, 2025
Homeकोकणरायगडमराठी शाळेसमोर बियरच्या बाटल्यांचा खच

मराठी शाळेसमोर बियरच्या बाटल्यांचा खच

शाळा परिसर बनतोय मद्यपींचा अड्डा

तळा : तळा शहरातील शाळा, परिसर मद्यपींचा अड्डा बनत चालला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेसमोर असलेल्या मैदानावर मोठ्या प्रमाणावर बियरच्या बाटल्या पडलेल्या अवस्थेत आढळून आल्या आहेत. यामुळे रात्रीच्या वेळी हे मैदान मद्यपींचा अड्डा बनला असल्याचे दिसून येत आहे. मराठी शाळेसमोर असलेल्या गोपीनाथ वेदक मैदानावर शाळेतील विद्यार्थी नेहमी खेळाचा सराव करताना पाहायला मिळतात.

Raigad Fort : शिवभक्तांच्या मागणीची पूर्तता होणार

हिवाळी क्रीडा स्पर्धा जवळ आल्याने या मैदानावर नेहमीच विद्यार्थ्यांची वर्दळ पाहायला मिळते. गुरुवारी सकाळी विद्यार्थी व शिक्षक वर्ग शाळेत येत असताना त्यांना शाळेसमोरच मैदानावर बियरच्या रिकाम्या बाटल्या पडलेल्या व काही बॉटल फुटलेल्या अवस्थेत दिसून आल्या. हे दृश्य पाहून शिक्षक व विद्यार्थ्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली.
रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेऊन अविचारी मद्यपींकडून ज्ञानाचे प्रसार करणाऱ्या शाळा परिसरात मद्यप्राशन केले जात असल्याने पोलिसांनी रात्रीच्या वेळी गस्त घालून अशा मद्यपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -