मुंबई : वांद्रे वरळी सी-लिंकवर आज दुपारी चार गाड्या एकमेकांवर आदळून अपघात (Bandra Worli Link car accident) झाला. सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. वरळीच्या दिशेने एक्झिट पॉईंटसमोर या ४ वाहनांचा अपघात झाला. मात्र ऐन मोक्याच्या ठिकाणी अपघात झाल्याने सी लींकवर वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झाली होती.
या अपघाताची माहिती मिळताच सी लिंक भागात वरळी पोलिसांसह वाहतूक पोलीस दाखल झाले. वरळी पोलिसांकडून अपघात झालेल्या गांड्याना हटवण्याचे काम सुरु आहे. तसेच, या भागातील वाहतुक कोंडी हळूहळू सुधारत असल्याची माहिती आहे.
दुपारी कामानिमित्त जाणाऱ्या चाकरमान्यांना या वाहतुक कोंडीचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागला. वरळीतून बांद्रा भागात जाणाऱ्या चाकरमान्यांना या सी-लिंकचा मोठा फायदा होतो.