Thursday, October 23, 2025
Happy Diwali

Anganwadi Jatra : आंगणेवाडी आई भराडी देवी जत्रोत्सव २२ फेब्रुवारी २०२५ रोजी!

Anganwadi Jatra : आंगणेवाडी आई भराडी देवी जत्रोत्सव २२ फेब्रुवारी २०२५ रोजी!

१२ ते १४ डिसेंबर रोजी देवालय धार्मिक विधीसाठी बंद राहणार

मसुरे : प्रती पंढरपूर म्हणून दक्षिण कोकणात ओळखल्या जाणाऱ्या व लाखो भाविकांच्या नवसास पावणाऱ्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीची जत्रा २२ फेब्रुवारी २०२५ रोजी होणार आहे. गुरुवारी सकाळी देवीचा हुकूम घेऊन सदर तारीख निश्चित करण्यात आली. आंगणेवाडी जत्रा कोणत्याही तिथीवर अवलंबून नसते. देवीचा कौल घेऊनच यात्रेचा दिवस ठरविण्यात येतो. यावेळी सुमारे दहा लाखांपेक्षा जास्त भाविक यात्रेस उपस्थिती दर्शवतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आंगणेवाडीत येणारे लाखो भाविक देवीच्या दर्शनाची आस घेऊन येतात. वस्त्रालंकारांनी सजविलेली देवी याचि देही याचि डोळा पाहून जीवनाचे सार्थक झाल्याचा अनुभव भाविकांना या ठिकाणी येतो.

याच लाखो भाविकांना केंद्रबिंदू मानून भाविकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय न होता आई भराडी मातेचे दर्शन होण्यासाठी आंगणे कुटुंबीय आंगणेवाडीचे सर्व सदस्य मेहनत घेत असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष छोटू आंगणे यांनी दिली आहे. आंगणेवाडी जत्रेची तारीख निश्चित झाल्यानंतर रेल्वे तसेच खासगी वाहनांच्या बुकिंगसाठी चढाओढ लागणार आहे. प्रथेनुसार देवीला कौल लावून जत्रेची तारीख निश्चित झाली आहे. जत्रेच्या तारीख ठरविण्याचा कौल झाल्यानंतर श्री देवी भराडी मंदिर १२ ते १४ डिसेंबर २०२४ असे तीन दिवस धार्मिक विधीसाठी बंद राहणार आहे. कुणालाही प्रवेश दिला जाणार नाही.

Comments
Add Comment