
'या' चित्रपटात करणार एकत्र काम
मुंबई : 'मिस्टर परफेक्शनिस्ट' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बॉलीवूडचा सुपरस्टार अभिनेता आमिर खान (Aamir Khan) आणि साउथचे थलायवा रजनीकांत (Rajnikanth) यांनी ९०च्या शतकात 'आतंक आतंक' चित्रपटात एकत्र काम केले होते. चित्रपटातील या दोघांची जोडी सुपरहिट ठरली होती. आता तब्बल ३० वर्षांनंतर पुन्हा एकदा आमिर आणि रजनीकांतची जोडी मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.

ठाणे : ठाणे महानगरपालिकेला (Thane Municipality) मे. स्टेम प्राधिकरणाकडून दुरुस्ती आवश्यक कामे करण्यासाठी पाणीपुरवठ्याचा २४ (Thane Water Supply) तासांसाठी शटडाऊन घेतला आहे. ...
बॉलिवूड सुपरस्टार आमिर खान याचा आगामी 'कुली' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या 'कुली' चित्रपटाच्या शूटिंगला जयपूरमध्ये सुरूवात करण्यात आली आहे. या सिनेमामध्ये बॉलीवूड अभिनेता आमिर खानसोबत साउथ अभिनेत्री श्रुती हसन स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. या चित्रपटात आमिर खान आणि श्रुती हसन पहिल्यांदाच एकत्र काम करणार असल्यामुळे त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री पाहण्यासाठी चाहते देखील उत्सुक आहेत. तसेच तमिळ सिनेसृष्टीतील दिग्गज रजनीकांत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटात आमिर खान तब्बल ३० वर्षांनंतर रजनीकांतसोबत एकाच फ्रेममध्ये दिसणार आहे.
दाक्षिणात्य दिग्दर्शक लोकेश नागराज हे 'कुली' चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. लोकेश नागराज यांनी त्यांच्या आजवरच्या कारकिर्दीत 'विक्रम', 'कैथी' आणि 'लियो' यांसारख्या सुपरहिट चित्रपटांचं दिग्दर्शन केलंय. 'कुली'मध्येCoolieरजनीकांत, श्रुती हासन आणि आमिर खानसोबतच नागार्जुन, उपेंद्र, सौबिन शाहीर, सत्यराज, रेबा मोनिका जॉन आणि इतर स्टार्स दिसणार आहेत. अनिरुद्ध रविचंदर यांनी सन पिक्चर्स निर्मित 'कुली'साठी संगीत दिले आहे. येत्या नवीन वर्षात म्हणजेच २०२५ मध्ये'कुली' सिने जगभरात प्रदर्शित करण्यात येणार आहे.