ठाणे : ठाणे महानगरपालिकेला (Thane Municipality) मे. स्टेम प्राधिकरणाकडून दुरुस्ती आवश्यक कामे करण्यासाठी पाणीपुरवठ्याचा २४ (Thane Water Supply) तासांसाठी शटडाऊन घेतला आहे. यादरम्यान आज सकाळी ९ वाजता ते उद्या सकाळी ९ वाजेपर्यंत असा २४ तासांचा शटडाऊन घेत ठाणे महानगरपालिकेने पाणीपुरवठा योजनेचे नियोजन केले आहे. यावेळी ठाणे शहरात टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे ठाणेकरांना पाणी जपून वापरा, असे आवाहन करण्यात आले आहे.
RBI Bomb Threat : आरबीआयला धमकीचा मेल; रशियन भाषेचा वापर! पोलीस प्रशासन अॅक्शन मोडवर
घोडबंदर रोड, पातलीपाडा, पवारनगर, कोठारी कम्पाउंड, आझादनगर, डॉगरीपाडा, वाघबीळ, आनंदनगर, कासारवडवली, ओवळा, इत्यादी ठिकाणाचा पाणीपुरवठा आज सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत बंद राहील व समतानगर, ऋतुपार्क, सिध्देश्वर, इंटरनिटी, जॉन्सन, जेल, साकेत. उथळसर, रेतीबंदर, कळव्याच्या व मुंब्राचा काही भाग आज रात्री ९ ते शनिवार रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहील. अशा रितीने पाणीपुरवठा सुरु ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
दरम्यान, शटडाऊन मुळे पाणीपुरवठा पुर्व पदावर येईपर्यंत पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करुन ठेवावा व ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे, असेही सांगण्यात आले आहे.