रत्नागिरी: रत्नागिरीत गेल्यावर्षी भरविण्यात आलेल्या नमन महोत्सवाला उत्तम प्रतिसाद मिळाला. अनेक स्थानिक कलाकारांना एक मोठे व्यासपीठसुद्धा मिळाले होते. रत्नागिरी आणि परिसरात होणाऱ्या या ‘नमन खेळे’ या लोककलेला उत्तम भविष्य आहे. अशा येथील या मंडळातील कलावंताच्या एकत्रित सहभागातून महानमनाची मुहूर्तमेढ यावर्षीही उभारी घेण्यास सज्ज होत आहे.
Aadhaarcard Update : १५ डिसेंबरपूर्वी आधार अपडेट करा आणि आयटीआर भरा, अन्यथा भरावा लागेल दंड!
रत्नागिरी तालुका कोकण नमन कलामंचाच्या वतीने या महानमन निर्मितीचा प्रारंभ झाला. त्यावेळी अध्यक्ष प्रभाकर ऊर्फ पी. टी. कांबळे, उपाध्यक्ष अरुण कळंबटे, संस्थापक अध्यक्ष श्रीधर खापरे, सुरेश होरंबे, विश्वनाथ गावडे, धनावडे, श्रीकांत बोंबले तसेच संस्थेचे इतर पदाधिकारी आणि सदस्य, कार्यकारिणी सदस्य व कलावंत उपस्थित होते. या कलाकृतीसाठी सर्व पदाधिकारी, सदस्य मेहनत घेत आहेत.
कोणत्याही कलेला राजसत्तेचे पाठबळ मिळाले की ती कला आणि कलाकार बहरतात. कोकण ही कलेची, कलाकारांची भूमी आहे. या लोककलेच्या माध्यमातून समाजप्रबोधनपर भाष्य, काल्पनिक, पौराणिक, ऐतिहासिक कथांच्या आधारे एक चित्तथरारक वगनाट्य सादर करीत नमनाचा सांगावा केला जातो. यातूनच रंगभूमीची सेवा केली जाते. महानमन निर्मितीतून कलाकार व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयास आहे.