Saturday, January 18, 2025
Homeताज्या घडामोडीS.M krishana Passed Away : महाराष्ट्राचे माजी राज्यपाल आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री...

S.M krishana Passed Away : महाराष्ट्राचे माजी राज्यपाल आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस.एम. कृष्णा यांचे निधन

बंगळुरू : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे माजी राज्यपाल सोमनहल्ली मल्लैय्या कृष्णा यांचे आज मंगळवारी दीर्घ आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी ते ९२ वर्षांचे होते. कृष्णा यांनी बंगळूर येथील त्यांच्या निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर मद्दूर येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.

दिवंगत एस.एम. कृष्णा यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री, केंद्रीय परराष्ट्र मंत्री, महाराष्ट्राचे राज्यपाल अशी विविध १० मानाची पदे भूषविली होती. एस.एम. कृष्णा यांनी १९६० च्या दशकात राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी १९६२ साली पहिल्यांदाच अपक्ष म्हणून मद्दूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. यावेळी त्यांनी काँग्रेस उमेदवाराचा पराभव केला होता. त्यानंतर ते प्रजा सोशलिस्ट पार्टीत दाखल झाले. तसेच १९६८ मध्ये त्यांनी मंड्या लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक जिंकली.

M.S.Dhoni : क्रिकेट पाठोपाठ जाहिरातींच्या जगातही धोनी ठरतोय ‘किंग’

कृष्णा १९७१ मध्ये काँग्रेसमध्ये परतले. पुन्हा त्यांनी या मतदारसंघात विजय मिळवला. त्यानंतर १९८५ मध्ये ते राज्याच्या राजकारणात परतले. ते १९९९ मध्ये कर्नाटकचे मुख्यमंत्री बनले आणि २००४ पर्यंत मुख्यमंत्री पदावर राहिले. कृष्णा यांनी जानेवारी २०२३ मध्ये सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेतली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एस. एम. कृष्णा यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. आपल्या शोकसंदेशात पंतप्रधान म्हणाले की, एस.एम. कृष्णा हे एक असामान्य नेते होते. इतरांचे जीवनमान सुधारण्यासाठी त्यांनी नेहमीच अथक परिश्रम घेतले. कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात विशेषत: पायाभूत सुविधांच्या विकासावर त्यांनी भर दिला. एस. एम. कृष्णाजी हे एक विपुल वाचक आणि विचारवंत असल्याचे मोदींनी नमूद केले आहे. गेल्या अनेक वर्षांमध्ये एस. एम. कृष्णा यांच्याशी मला संवाद साधण्याची अनेकवेळा संधी मिळाली. त्यांची ही आठवण नेहमी स्मरणात राहील असे मोदी म्हणालेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -