Saturday, May 10, 2025

देशताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Delhi School Bomb Threat : दिल्लीतील शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी!

Delhi School Bomb Threat : दिल्लीतील शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी!

विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये भीतीचे वातावरण


नवी दिल्ली : दिल्लीतील शाळा, हॉटेल, विमानतळासह अनेक ठिकाणे बॉम्बने उडवण्याची धमकी दिल्याच्या घटना सातत्याने उघडकीस येत होत्या. अजूनही हे सत्र सुरूच असल्याचे दिसून येत आहे. आज सकाळी पुन्हा दिल्लीतील शाळा (Delhi School) बॉम्बने उडवून देण्याच्या धमक्या देण्यात (Delhi School Bomb Threat) आल्या आहेत. धमकीची माहिती मिळताच घटनेचा कसून तपास सुरू करण्यात आला आहे. मात्र यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.



आज सकाळी सात वाजेच्या सुमारास दिल्लीतील चाळीस शाळांना ईमेलद्वारे बॉम्बच्या धमक्या मिळाल्या. यामध्ये पश्चिम विहारच्या डीपीएस आणि जीडी गोयंका स्कूल व्यवस्थापनाला धमकी देण्यात आली. त्याचबरोबर आरके पुरममधील दिल्ली पब्लिक स्कूल, पश्चिम विहारमधील जीडी गोएंका, मयूर विहारमधील मदर मेरी स्कूल, चाणक्यपुरीतील ब्रिटिश स्कूल, मयूर विहारमधील सलवान पब्लिक स्कूल, मंडी हाऊसमधील मॉडर्न स्कूल, केंब्रिज स्कूल, वसंत कुंजमधील दिल्ली पब्लिक स्कूल अशा अनेक शाळांचा समावेश आहे.


दरम्यान, धमकीनंतर शाळा प्रशासनाने सर्व विद्यार्थ्यांना काळजीपूर्वक घरी पाठवले आहे. तसेच तात्काळ अग्नीशमन दल आणि पोलिस दलाला या घटनेची माहिती देण्यात आली. सध्या शाळांमध्ये दिल्ली पोलिसांचे एक पथक आरके पुरमच्या दिल्ली पब्लिक स्कूल येथे पोहचले आहे. याबरोबरच बॉम्ब शोधक पथक देखील घटनास्थळी हजर झाले आहे. (Delhi School Bomb Threat)

Comments
Add Comment