मुंबई : कलाकार कायम त्यांची स्वतःची गाडी घेऊन प्रवास करताना नेहमीच दिसतात. पण आज अभिनेता स्वप्नील जोशीने चक्क रिक्षाने प्रवास केला! या मागची गोष्ट देखील तशीच आहे. मुंबई आणि इथलं ट्रॅफिक कोणाला चुकलं नाही पण अशातच मुंबईत आज फ्लायओव्हरवर एका गाडीने पेट घेतला.
मुंबई पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी ही परिस्थिती आटोक्यात आणली आणि म्हणून अनेक गाड्यांचा खोळंबा झाला. मग काय शूटला पोहचण्यासाठी स्वप्नीलने रिक्षाने प्रवास केला आणि तो शूट ला पोहचला. ही सगळी गोष्ट त्याने त्याच्या सोशल मीडिया मधून प्रेक्षकांना सांगितली आहे.