Friday, January 17, 2025
Homeताज्या घडामोडीBaaghi 4 : ‘बागी 4’ मधील संजय दत्तचा खतरनाक लूक समोर

Baaghi 4 : ‘बागी 4’ मधील संजय दत्तचा खतरनाक लूक समोर

मुंबई : साजिद नाडियादवालाच्या फ्रँचायझी असलेल्या आणि टायगर श्रॉफ स्टार ‘बागी’ सिनेमाचा चौथा भाग अर्थात ‘बागी 4’ ची घोषणा करण्यात आली होती. बागी चित्रपटाच्या शेवटच्या तीन भागांनी बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली होती आणि आता चौथ्या भागाचीही लोकांमध्ये क्रेझ वाढत आहे.आता या चित्रपटामधील खलनायकाचा नवा पोस्टर समोर आला आहे.या नव्या पोस्टरमधून संजय दत्तची व्यक्तिरेखा आणि लूक समोर आला आहे, जो पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tiger Shroff (@tigerjackieshroff)

सोमवारी टायगर श्रॉफ आणि साजिद नाडियादवाला यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर बागी 4 च्या खलनायकाचे अनावरण केले. त्याने संजय दत्तचे एक जबरदस्त पोस्टर शेअर केले आहे, ज्यामध्ये या अभिनेत्याचा लूक पाहून कोणीही दंग होईल. या नव्या पोस्टरच्या माध्यमातून चित्रपटातील व्हिलनचा चेहरा रिव्हिल करण्यात आला आहे. मनोज वाजपेयी आणि जयदीप अहलावत यांच्यानंतर चित्रपटामध्ये खलनायकाच्या भूमिकेत अभिनेता संजय दत्त पाहायला मिळणार आहे. या पोस्टरमध्ये संजय दत्त कधीही न पाहिलेल्या खतरनाक लुकमध्ये दिसत आहे.या पोस्टरमध्ये संजय दत्त खूर्चीवर बसून ओरडताना दिसत आहे. तसेच त्याच्या मांडीवर रक्तबंबाळ अवस्थेत असलेली एक मुलगी पाहायला मिळते आहे. ‘हर आशिक एक विलेन है’ असं या पोस्टवर लिहलं आहे. या पोस्टरवरून अभिनेता त्याच्या प्रेमाला गमावल्यानंतर खलनायक बनतो असा अंदाज लावला जात आहे.

Virat Kohali : विराट कोहलीच्या निर्णयाचं सुनील गावसकर यांनी केलं कौतुक

काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील टायगर श्रॉफचे पोस्टरही रिलीज झाले होते. ज्यामध्ये तो बाथरुममध्ये बसलेला दिसतो, त्याच्या हातात दारूची बाटली, तोंडात सिगारेट आणि हातात रक्ताने माखलेले हत्यार दिसत आहे. तर भिंतीवर रक्ताचे डाग पडलेले दिसतात. त्याच भिंतीवर ‘बागी 4’ ही अक्षरं दिसतात. यातच आता संजय दत्तचाही नवा अवतार समोर आला आहे. साजिद नाडियादवाला निर्मित, बागी 4 चे दिग्दर्शन ए. हर्ष करत आहेत.बागी फ्रँचायझीचा हा चौथा चित्रपट आहे. हा चित्रपट पुढील वर्षी ५ सप्टेंबर २०२५ रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. आतापर्यंत फक्त टायगर आणि संजयचे लूक समोर आले आहेत. हिरोईनबाबत अजूनही सस्पेन्स ठेवण्यात आला आहे. या चित्रपटामध्ये कोणती अभिनेत्री काम करणार हे पाहणे उत्कंठाचे ठरणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -