Saturday, January 18, 2025
Homeताज्या घडामोडीIAS Sanjay Malhotra : संजय मल्होत्रा आरबीआयचे नवे गव्हर्नर; नेमके कोण आहेत...

IAS Sanjay Malhotra : संजय मल्होत्रा आरबीआयचे नवे गव्हर्नर; नेमके कोण आहेत संजय मल्होत्रा?

मुंबई : केंद्र सरकारने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नरपदी IAS अधिकारी संजय मल्होत्रा यांची नियुक्ती केली आहे. संजय मल्होत्रा हे सध्या महसूल विभागाचे सचिव आहेत. त्यांची आता आरबीआयच्या गव्हर्नरपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आरबीआयचे सध्याचे गव्हर्नर शक्तिकांद दास यांचा कार्यकाळ येत्या १० डिसेंबर २०२४ ला समाप्त होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून नव्या गव्हर्नरपदी संजय मल्होत्रा यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. पुढील ३ वर्ष ते या पदावर असणार आहेत. संजय मल्होत्रा हे सध्या महसूल सचिव पदावर कार्यरत होते. दरम्यान केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीकडून त्यांची नव्या गव्हर्नरपदी नियुक्ती करण्यात आल्याचं जाहीर करण्यात आले.

Nagpur Winter Session 2024 : ठरलं तर! या ‘दिवशी’ होणार हिवाळी अधिवेशन सुरु

संजय मल्होत्रा नेमके कोण आहेत?

संजय मल्होत्रा ​​हे १९९० बॅचचे राजस्थान केडरचे भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी आहेत. त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कानपूर येथून कॉम्प्युटर सायन्समध्ये अभियांत्रिकी पदवी घेतली आहे. मल्होत्रा यांनी प्रिन्स्टन युनिव्हर्सिटी, यूएसए येथून पब्लिक पॉलिसी या विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. त्यांंनी ऊर्जा, वित्त आणि कर, माहिती तंत्रज्ञान, खाणी इत्यादींसह विविध क्षेत्रांमध्ये काम केले आहे. सध्या ते अर्थ मंत्रालयात सचिव (महसूल) पदावर कार्यरत आहेत. त्यांनी भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत वित्तीय सेवा विभागात सचिवपद भूषवले होते. मल्होत्रा यांना राज्य आणि केंद्र सरकारमधील वित्त आणि कर आकारणी या क्षेत्राचा मोठा अनुभव आहे. ते प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करांच्या संदर्भात कर धोरण तयार करण्यात महत्वाची भूमिका बजावतात.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -