मुंबई : मुंबईतील जोगेश्वरी ब्रिजवर (Jogeshwari Bridge) एका कारला आग लागल्याची माहिती समोर आली आहे. या आगीत कार पूर्णपणे जळून खाक झाली असून कारमधून दाट धूर निघत आहेत. (Jogeshwari Car Fire)
Indian Student Murder : कॅनडातील भारतीय विद्यार्थ्यावर गोळीबार; संपूर्ण थरार सीसीटीव्हीत कैद!
आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र अधिकारी या घटनेचा अधिक तपास करत आहेत. सुदैवाने आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पुलावरील वाहतुकीवर गंभीर परिणाम झाला आहे. तसेच प्रवाशांना दीर्घ विलंबाचा सामना करावा लागत असल्यामुळे आपत्कालीन पथके परिस्थिती नियंत्रित करण्यासाठी काम करत आहेत. (Jogeshwari Car Fire)