ऋतु हिरवा ऋतु बरवा
पाचूचा वनि रुजवा
युगविरही हृदयावर सरसरतो मधूशिरवा
भिजुनी उन्हे चमचमती
क्षण दिपती क्षण लपती
नितळ निळ्या अवकाशी मधुगंधी तरल हवा
मनभावन हा श्रावण
प्रियसाजण हा श्रावण
भिजवी तन भिजवी मन हा श्रावण
थरथरत्या अधरांवर प्रणयी संकेत नवा
नभी उमटे इंद्रधनू
मदनाचे चाप जणू
गगनाशी धरणीचा जुळवितसे सहज दुवा
गीत – शांता शेळके
स्वर – आशा भोसले
मेंदीच्या पानांवर
मेंदीच्या पानांवर मन अजून झुलतेऽ गं
जाईच्या पाकळ्यांस दंव अजून सलतेऽ गं
झुळझुळतो अंगणात तोच गार वाराऽ गं
हुळहुळतो तुळशीचा अजून देह साराऽ गं
अजून तुझे हळदीचे अंग अंग पिवळेऽ गं
अजून तुझ्या डोळ्यांतील मोठेपण कवळेऽ गं
गीत – सुरेश भट
स्वर – लता मंगेशकर
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…