Wednesday, January 15, 2025
Homeताज्या घडामोडीपवारांचा खोटारडेपणा म्हणजे संविधानाचा अपमान - चंद्रशेखर बावनकुळे

पवारांचा खोटारडेपणा म्हणजे संविधानाचा अपमान – चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई: शरद पवार यांचा मी सन्मान करतो. त्यांना दीर्घ राजकीय अनुभव आहे, परंतु त्यांनी या वयामध्ये अशा प्रकारचा खोटारडेपणा करणे, जनतेला कन्फ्युज करणे अयोग्य आहे. एक प्रकारे ते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचा अपमान आहे, अशी परखड टिका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

राज्यात झालेला त्यांनी पराभव स्वीकारलं पाहिजे, असे सांगून बावनकुळे म्हणाले, जेव्हा पराभव स्वीकारता येत नाही तेव्हा जनतेला कन्फ्युज करण्यासाठी व आपलं अपयश लपवण्याचं काम ते करत असून, जनतेने तर विधानसभामध्ये दाखवून दिले म्हणून ईव्हीएम मशीनवर दोष देऊन पुन्हा आपलं अपयश लपवण्याचे पाप पवार करत आहेत.

Eknath Shinde : ईव्हीएमचं रडगाणं सोडून विकासाचं गाणं गा!

विधान भवन परिसरात बावनकुळे माध्यमांशी बोलताना म्हणाले, विधानसभेमधील त्यांचा अत्यंत मोठा पराभव झाला आहे.जनतेने त्यांना नाकारले म्हणून आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये पराभवाची भीती असल्यामुळे आपले जनमत वाचवण्याकरिता शरद पवार पुन्हा प्रयत्न करत आहेत आणि मारकडवाडीमध्ये आलेली जी लोक आहेत ती पवार यांची कार्यकर्तेमंडळी आहेत. मारकडवाडीतील जनता त्यात कुठे आहे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -