Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण’ योजनेसाठी अर्जाची मुदत वाढवण्याची मागणी

सोलापूर : राज्य सरकारला सत्तेच्या खुर्चीपर्यंत पोहोचवणार्‍या ‘लाडकी बहीण’ योजनेचा(Ladki Bahin Yojana) अर्ज भरण्याची शेवटची तारीख उलटून गेली आहे. अर्ज भरण्याची शेवटची तारीख १५ ऑक्टोबर होती. आता ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी अर्ज करता येत नाही. या योजनेपासून अनेक महिला वंचित असून त्यांना अर्ज करण्यासाठी आणखी मुदत वाढवून देण्याची मागणी महिलावर्गातून होत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर ‘लाडकी बहीण’ योजना सुरू ठेवणार असल्याचे सांगितले आहे. ‘लाडकी बहीण’ योजनेत आतापर्यंत ज्या महिलांनी अर्ज भरले नाहीत त्यांना आता अर्ज भरता येणार का याबाबत अनिश्चितता आहे. यामुळे अनेक महिलांनी ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी पुन्हा अर्ज करण्यास सवलत देण्याची मागणी करण्यात येते आहे.


राज्यात साधारण सव्वादोन कोटी महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. सोलापूर जिल्ह्यात या योजनेंतर्गत १० लाख ५२ हजार ३९२ महिला आहेत. जिल्ह्यासाठी पुढील वाढीव हप्ता २१५ कोटी ३३ लाख २५ हजारांचा आहे. योजनेंतर्गत आता काही निकष असणार आहेत

Comments
Add Comment

बिनधास्त करा नववर्षाचे सेलिब्रेशन, मध्य रेल्वे मध्यरात्री सोडणार विशेष लोकल

मुंबई : नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईत ठिकठिकाणी रात्री उशिरापर्यंत कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. रात्री

ठाकरे बंधूंची युती, पण उबाठा आणि मनसैनिकांची दिलजमाई कुठे?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा आणि मनसेच्या युतीची जाहीर घोषण

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील

प्रभादेवीतील प्रभाग १९४ मनसेला सोडण्यास उबाठा गटाचा विरोध

मनसेला सोडल्यास उबाठात बंडखोरी होण्याची शक्यता मुंबई : दोन्ही ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केल्यांनतर आता जागा