Monday, August 25, 2025

Pune Crime : पुण्यात चाललंय काय! ४८ तासात ५ हत्या

Pune Crime : पुण्यात चाललंय काय! ४८ तासात ५ हत्या

नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर 

पुणे : विद्येच माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख असलेले पुणे शहर क्राईम शहर बनत चालले आहे. एकीकडे अपघात व ड्रग्सच्या विळख्यात अडकेलेले पुणे आता हत्येच्या प्रकरणातही वरचढ होत चालले आहे. अवघ्या ४८ तासात ५ हत्येच्या घटना उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे नराधमांना आता पोलिसांची भीती उरली नसून पुणेकरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

कुठे घडल्या हत्येच्या घटना?

  • सिंहगड रोड येथे नऱ्हे परिसरात पेट्रोल चोरीच्या संशयावरून चौघांकडून २० वर्षीय तरुणाची हत्या.
  • सिंहगड रोड येथे गणपती विसर्जन मिरवणूकदरम्यान झालेल्या वादातून हत्या
  • वाघोली लोहमार्ग येथे वडिलांना टाकल्या म्हटल्यामुळे एकाची दगडाने ठेचून हत्या
  • वानवडी येथे कॉलेजला जाणाऱ्या एका अल्पवयीन तरुणावर पूर्व वैमनस्यातून कोयत्याने वार करत जीवघेणी हत्या
  • कोंढवा येथे मीनाताई रुग्णालयासमोर बबलू उर्फ शेगडीवाला नावाच्या व्यक्तीचा डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घालून हत्या.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >