लखनऊ : बांगलादेशातील हिंदूंवर (Bangladesh Hindu) होत असलेला अत्याचार आणि संभलमधील हिंसाचार प्रकरणी (Sambhal Masjid Controversy) मौन बाळगणा-या सपा आणि काँग्रेसवर बहुजन समाज पक्षाच्या (BSP) प्रमुख मायावती (Mayawati) यांनी जोरदार हल्लाबोल केला.
मायावती यांनी शनिवारी बोलताना आरोप केला की काँग्रेस बांगलादेशविषयक मुद्यावर मौन बाळगून मुस्लिम मतांच्या पाठीशी उभा राहण्याचा प्रयत्न करत आहे.
Abu Azmi : tata bye bye खतम! उबाठावर आरोप करत समाजवादीचा महाविकास आघाडीला राम राम
मायावती म्हणाल्या, “सपा आणि काँग्रेस दोन्ही पक्ष संभलमधील हिंसाचाराच्या मुद्द्यावर मुस्लिम मतदारांना खुश करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. काँग्रेस, सपा आणि त्यांचे समर्थक या मुद्द्यावर एकाच माळेचे मणी आहेत. अशा परिस्थितीत भाजपाच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने पुढे जाऊन आपली जबाबदारी पार पाडावी, ज्यामुळे शोषित दलित वर्गाला आणखी त्रास सहन करावा लागणार नाही.”
मायावती यांनी केंद्र सरकारने बांगलादेश सरकारशी संवाद साधून तिथून भारतीयांना भारतात परत आणण्याची मागणी केली. त्या पुढे म्हणाल्या, “संसदेतील विरोधी पक्ष राष्ट्रीय आणि जनहिताचे मुद्दे उचलण्याऐवजी, संभलमधील हिंसाचाराचा मुद्दा उचलून मुस्लिम मतदारांना खुश करण्याचा प्रयत्न करत आहेत, विशेषतः सपा आणि काँग्रेस पक्ष. त्यांना इतर कोणत्याही मुद्द्यांशी काहीही संबंध नाही.”
त्यांनी आरोप केला की, संभलमध्ये या पक्षांनी मुस्लिम समाजात मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. “मुस्लिम समाजाला सजग राहायला लागेल. हेच नाही, तर दलित वर्गाच्या खासदारांना संसदेत आणणारे लोक, त्यांच्या पक्षाच्या नेत्याला खुश करण्यासाठी दलित अत्याचारावर मौन राखत आहेत. ही एक शोकांतिका आहे,” अशी टीका मायावती (Mayawati) यांनी केली.