मुंबई : महायुतीचा भव्यदिव्य असा शपथविधी सोहळा पार पडला असताना दुसरीकडे मात्र आता मंत्रिमंडळ विस्ताराची लगबग सुरू आहे. दरम्यान, अनेकजण मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत. मंत्रिपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. सध्या तिन्ही पक्षांतील मिळून २३४ आमदार आहेत आणि एकूण ४३ मंत्रिपदे आहेत. त्यामुळे मंत्रिपदासाठी इच्छुकांची भाऊगर्दी आहे. त्या इच्छुकांची मनधरणी करणे किंवा त्यांना शांत करणे हे सध्या देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासमोर मोठे आव्हान आहे.
श्री शरद पवार साहेब, @PawarSpeaks
आपण ज्येष्ठ नेते आहात, किमान आपण तरी देशातील जनतेची दिशाभूल करू नका.
जास्त मतं मिळूनही कमी जागा कशा?
चला 2024 लोकसभेत काय झाले ते पाहू,
भाजपाला मतं 1,49,13,914 आणि जागा 9, पण काँग्रेसला मतं 96,41,856 आणि जागा 13.
शिवसेनेला 73,77,674 मतं आणि 7…— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 7, 2024
शपथविधीच्या आधी शपथविधीवरून महायुतीत अनेक बैठका पार पडल्या आहेत. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी दिल्लीला जाऊन अमित शहांची भेट घेतली. त्यावेळी राज्यातून मंत्रिपदासाठी तसेच जे सतत वादग्रस्त वक्तव्य करतात आणि वादाच्या भोवऱ्यात सापडतात, अशा आमदारांचे दिल्लीत भाजपा पक्षश्रेष्ठींनी रिपोर्टकार्ड मागवले होते. यावेळी जे आमदार वादग्रस्त वक्तव्य करतात, अशा आमदारांना मंत्रिपदापासून लांब ठेवा किंवा अशा आमदारांना मंत्रिपद देऊ नका, असे दिल्लीतील भाजपा पक्षश्रेष्ठींनी राज्यातील भाजपा नेत्यांना कळविल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळे भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांतील अनेक वाचाळवीर आमदार आहेत. जे सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरून वादाच्या भोवऱ्यात सापडतात, अशा आमदारांना यावेळी मंत्रिपदापासून लांबच राहावे लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
Swearing in ceremony : ‘महायुती’च्या आमदारांचा शपथविधी तर महाविकास आघाडीचा बहिष्कार
मंत्रिमंडळ विस्तारात काही अनुभवी नेत्यांना किंवा यापूर्वी मंत्रिपद भूषविलेल्यांनादेखील डावलले जाण्याची शक्यता आहे. त्यांच्या जागी नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र महायुतीचे २३२ आमदार असताना आणि केवळ ४३ मंत्रिपदे असताना मंत्रिपदाची मान कुणाकुणाच्या गळ्यात पडणार आणि कोण-कोण इच्छुक नाराज होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
जर रेशो काढायचा म्हटले तर २८० आमदारांमागे आणि ४० मंत्रिपदानुसार ९ आमदारांमागे एक मंत्रिपद असे समीकरण असेल. त्यामुळे २८० आमदार आणि ४० मंत्रिपदे यांचे वाटप करताना देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मोठे आव्हान असून, ज्यांची ज्यांची मंत्रिपदासाठी भाऊगर्दी आहे, त्यांची मनधरणी करणे आणि त्यांना शांत करणे हेसुद्धा महायुतीतील प्रमुख नेत्यांसमोर आव्हान असल्याचेही जयंत माईणकर यांनी म्हटले आहे.