Ajit Pawar : ईव्हीएमचा विषय काढून महाविकास आघाडी रडीचा डाव खेळत आहे - अजित पवार

मुंबई : महायुतीला इतके मोठे बहुमत मिळाले आहे की आता ईव्हीएमचा विषय काढून महाविकास आघाडी रडीचा डाव खेळत आहे असा थेट हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर माध्यमांशी बोलताना केला.

आम्ही महाविकास आघाडीमध्ये काम केले आहे. त्यामुळे ईव्हीएम मशीनला दोष देण्यात काहीच अर्थ नाही. लोकसभेला ईव्हीएमने ३१ जागा महाविकास आघाडीला दिल्या त्यावेळी ईव्हीएम मशीन खूप चांगली होती. मात्र विधानसभेत महायुतीच्या बाजुने जनतेने कौल दिला तर ईव्हीएमला दोष द्यायला मविआने सुरुवात केली आहे. लोकशाहीत प्रत्येकाला वक्तव्य करण्याचा अधिकार आहे. परंतु महाविकास आघाडीच्या आमदारांना शपथ घेण्याचा उद्याचा दिवस आहे. त्यांना उद्या संध्याकाळपर्यंत शपथ घ्यावीच लागेल. तरच त्यांना सोमवारी कामकाजात भाग घेता येणार आहे. याबाबतची माहिती सर्वांना आहे. परंतु पहिल्याच दिवशी आम्ही संख्येने कमी असलो तरी आम्ही काही वेगळ करतोय. त्यांचे अस्तित्व दाखवण्याचा केविलवाणा प्रकार सुरू आहे असा खोचक टोलाही अजित पवार यांनी केला.




सुरुवातीला महाविकास आघाडीचे आमदार शपथविधीसाठी सभागृहात बसले होते मात्र काही वेळाने ते सर्व बाहेर निघून गेले. इतकी वर्षे मी त्यांच्यासोबत होतो तेव्हा मी चांगला होतो. मी कुणासोबत उपमुख्यमंत्री म्हणून काम केले नाही ते सांगा अशी विचारणा करत मी जर दोषी असतो किंवा भ्रष्टाचारी असतो तर त्यांनी मला उपमुख्यमंत्री केलेच नसते. मात्र सध्या ते राजकीय भूमिकेतून मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाला. परंतु मी योग्यठिकाणी न्याय मागत होतो आणि तो मला मिळाला आहे असेही अजित पवार यांनी पत्रकारांच्या प्रश्नांला उत्तर देताना स्पष्ट केले.

Comments
Add Comment

विभागाच्या आश्रमशाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना

मुंबई : इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून चालविण्यात येणाऱ्या विजाभज प्रवर्गाच्या खाजगी अनुदानित निवासी

पंतप्रधान ८-९ ऑक्टोबरला महाराष्ट्र दौऱ्यावर; मुंबईकरांना मिळणार 'दुहेरी भेट'! 

१९,६५० कोटींच्या नवी मुंबई विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे पंतप्रधान करणार उदघाटन ३७,२७० कोटींचा मुंबई मेट्रो

मुंबईत झोपडपट्टी पुनवर्सन प्राधिकरण (एसआरए) अंतर्गत

झोपडपट्टीच्या पुनर्विकासासाठी समूह पुनर्विकास योजना राबविणार. मुंबई : मुंबईतील क्षेत्रात मोठ्या खाजगी, शासकिय,

राज्य सरकारचे ‘पुनर्वापर धोरण २०२५’ जाहीर, ४२४ शहरांना मिळणार लाभ

मुंबई : राज्यातील नागरी भागातील सांडपाण्यावर प्रक्रिया करुन त्याच्या पुनर्वापराद्वारे चक्रीय अर्थव्यवस्थेस

महाराष्ट्र राज्याचे रत्ने व आभूषणे धोरण – २०२५ जाहीर

राज्याच्या गुंतवणूक, औद्योगिक क्षेत्रासाठी झळाळी एक लाख कोटीं रुपयांची गुंतवणूक, पाच लाख नवीन रोजगार

UIDAI चा मोठा निर्णय: आता ७ ते १५ वर्षे वयोगटातील मुलांच्या आधार बायोमेट्रिक अपडेटसाठी कोणतेही शुल्क नाही!

मुंबई : भारतीय नागरिकांसाठी अत्यावश्यक असलेल्या आधार कार्डसंदर्भात युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI)