
यवतमाळ : प्लॅस्टिक किंवा इतर कृत्रिम वस्तूपासून बनविलेल्या नायलॉन मांजा या नावाने परिचित असलेल्या पक्क्या धाग्याचा वापर पतंग उडविण्याच्या वेळी करण्यात येतो. या धाग्यामुळे पक्षांना तसेच मानवी जिवितांस तीव्र इजा होण्याचा धोका असतो. त्यामुळे अशा धाग्यांच्या वापरास तसेच इतर वेळी नायलॉन मांज्याची धाग्यांची निर्मिती, विक्री, साठवणूक व वापर करण्यास संपूर्ण जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढून कायमस्वरुपी बंदी घातली आहे. संपूर्ण जिल्ह्यातील घाऊक व्यापारी, किरकोळ व्यापारी तसेच साठवणूकदार यांना नायलॉन मांजाची विक्री, साठवणूक करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या अशा अविघटनशील नायलॉन मांजामुळे गुरांना उद्भवणारा धोका, माती व पाण्याच्या गुणवत्तेची पातळी घसरणे तसेच एकंदरीत परिस्थितीत प्राणीजातीला उद्भवणाऱ्या इजांना प्रतिबंध याद्वारे करण्यात येत आहे.

मुंबई : बॉलीवूड अभिनेता सलमान खान हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. सलमान खान नेहमीच त्याच्या वेगवेगळ्या चित्रपटांसाठी चर्चेत असतो. सलमान खानचे अनेक ...