मुंबई : बॉलीवूड अभिनेता सलमान खान हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. सलमान खान नेहमीच त्याच्या वेगवेगळ्या चित्रपटांसाठी चर्चेत असतो. सलमान खानचे अनेक चाहते आहेत. गेल्या काही दिवसांपासून सलमान खान बिश्नोई प्रकरणात चर्चेत आहे. सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून जीवे मारण्याच्या धमक्या मिळताना दिसत आहेत. फक्त हेच नाही तर सलमान खानच्या घरावर बिश्नोई टोळीकडून गोळीबार देखील करण्यात आला होता.
सलमान खानचे अत्यंत जवळचे मित्र बाबा सिद्दीकी यांच्यावर बिश्नोईच्या तीन शूटरकडून गोळीबार करण्यात आला. यानंतर बिश्नोई टोळीकडून एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर करण्यात आली. बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणी आतापर्यंत २६ जणांना अटक करण्यात आलीये.
Mahaparinirvan Din : महापरिनिर्वाण दिनानिमित्त नवनिर्वाचित सरकारने केले महामानवाला अभिवादन
बाबा सिद्दीकी प्रकरणातील अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून आता मोठा आणि धक्कादायक खुलासा करण्यात आलाय. आरोपीने सांगितले की, बाबा सिद्दीकी यांच्या अगोदर सलमान खान हाच त्यांच्या निशाण्यावर होता. मात्र, कडक सुरक्षा असल्याने त्यांना सलमान खान याच्यावर गोळीबार करता आला नाही. त्यांनी अनेकवेळा सलमान खानवर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सलमान खानच्या आजूबाजुला जास्त सुरक्षा असल्याने ते शक्य झाले नाही.
आरोपीचे बोलणे ऐकून सलमान खानच्या चाहत्यांचे टेन्शन वाढले आहे. वारंवार बाबा सिद्दीकी गोळीबारप्रकरणात अनेक खुलासे समोर येत आहेत. सततच्या धमक्यांमुळे सलमान खानची सुरक्षा वाढवण्यात आलीये.