Rajya Sabha: राज्यसभेत काँग्रेस खासदाराच्या आसनावर सापडले पैसे

  52

अभिषेक मनु सिंगवींच्या सीटवर नोटांचे बंडल आढळले


नवी दिल्ली: संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान राज्यसभा सभागृहात २२२ क्रमांकाच्या आसनावर चलनी नोटांचे बंडल आढळून आले. हे आसन काँग्रेस खासदार अभिषेक मनु सिंगवी यांचे आहे. त्यांच्या जागेवर नोटांचे बंडल आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली असून या प्रकरणी राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.



यासंदर्भात सभागृहाला माहिती देताना राज्यसभा सभापती जगदीप धनखड म्हणाले की, गुरुवारी (५ डिसेंबर रोजी) सभागृहाचे कामकाज आटोपल्यानंतर सभागृहाची तपासणी सुरू असताना आसन क्रमांक २२२ वर चलनी नोटांचे एक बंडल आढळून आले. हे आसन काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी यांना देण्यात आले आहे. नोटांचे बंड आढळल्याचे समजताच यासंदर्भात चौकशीचे आदेश देण्यात आल्याचे उपराष्ट्रपती धनखड यांनी सांगितले. धनखड याबाबत सभागृहाला देत असताना काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी खासदाराचे नाव घेऊ नये असा ग्राहक केला. दरम्यान अभिषेक मनू सिंघवी यांनी सदर बंडल आपले नसल्याचे सांगितले. मी राज्यसभेत जाताना फक्त ५०० रुपयांची नोट घेऊन जातो. मी पहिल्यांदाच याबद्दल ऐकले. मी दुपारी १२.५७ वाजता सभागृहात पोहोचलो आणि दुपारी 1 वाजता सभागृह तहकूब झाले. त्यानंतर, मी दुपारी १.३० पर्यंत कॅन्टीनमध्ये बसलो. अयोध्येचे खासदार अवधेश प्रसाद यांच्यासमवेत आणि संसदेतून बाहेर पडलो असे त्यांनी सांगितले. सिंघवी यांनी या घटनेच्या चौकशीचे स्वागत केले.

Comments
Add Comment

खासगी दुचाकींना बाईक टॅक्सी सेवा देण्यास केंद्र सरकारची परवानगी

नवी दिल्ली : देशात प्रथमच केंद्र सरकारने खासगी वापरासाठी नोंदणीकृत दुचाकींना राईड-हेलिंग अ‍ॅग्रीगेटर

Cloudburst Updates : एका दिवसात ११ ठिकाणी ढगफुटी, पूर, भूस्खलन अन् ३० जण... हिमाचल प्रदेशात हाहाकार

हिमाचल प्रदेश : हिमाचल प्रदेशात नैसर्गिक संकटाने तेथील जनजीवन पूर्णपणे ठप्प झाले आहे. अनेक रस्ते भूस्खलनाने बंद

उत्तराखंडमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना मिळाली मदत

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्याशी साधला संवाद एनडीआरएफच्या

अरबी समुद्रात तेलवाहक जहाजाला आग, भारतीय नौदलाने १४ जणांना वाचवले

मुंबई : अरबी समुद्रात 'एमटी यी चेंग' नावाच्या तेलवाहक जहाजाला आग लागली. भारतीय नौदलाने आग लागल्याची माहिती मिळताच

उत्तराखंडमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, महाराष्ट्राचे २०० पर्यटक अडकले

मुंबईतील ५० जणांचा समावेश उत्तराखंड: उत्तराखंडमध्ये ढगफुटीमुळे केदारनाथजवळ भूस्खलन झाल्याची बातमी समोर आली

शिवकाशीत फटाका कारखान्यात स्फोट, चौघांचा मृत्यू

शिवकाशी : तामिळनाडूतील शिवकाशीत फटाका कारखान्यात स्फोट झाला. या स्फोटामुळे चार मजुरांचा मृत्यू झाला आणि पाच जण