IND Vs AUS: आज अ‍ॅडलेडच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध भिडणार टीम इंडिया

मुंबई: भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. येथे दोन्ही संघादरम्यान बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीदरम्यान ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. पहिला सामना जिंकत भारतीय संघाने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. आता दुसरा कसोटी सामना डे-नाईट असेल. हा सामना गुलाबी बॉलने खेळवला जाणार आहे. सकाळी साडेनऊ वाजल्यापासून या सामन्याला सुरूवात होत आहे.


भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात एकच गुलाबी बॉलने कसोटी सामना खेळवण्यात आला. यात भारतीय संघाला ८ विकेटने पराभव सहन करावा लागला होता. हा सामना डिसेंबर २०२०मध्ये अ‍ॅडलेडमध्येच झाला होता. आता दोन्ही संघादरम्यान हा दुसरा गुलाबी बॉल कसोटी सामना खेळवला जाईल.



भारत-ऑस्ट्रेलिया दोघांचा गुलाबी बॉल कसोटीत पराभव


पहिला कसोटी सामना नोव्हेंबर २०१५मध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात अ‍ॅडलेडमध्ये खेळवण्यात आला होता. यात कांगारूंच्या संघाला ३ विकेटनी विजय मिळाला होता. यानंतर इतिहासात आतापर्यंत १० संघादरम्यान एकूण २२ डेनाईट कसोटी सामने खेळवण्यात आले आहेत. यातील सर्वाधिक सामने ऑस्ट्रेलियानेच १२ गुलाबी बॉल कसोटी सामने खेळले आहेत त्यापैकी ११ जिंकलेत तर एका सामन्यात पराभव झाला आहे.


Comments
Add Comment

BRICS : ब्रिक्स देशांच्या क्रीडामंत्र्यांचे संयुक्त घोषणापत्र

विशाखापट्टणम : आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम इथे ब्रिक्स क्रीडा संयुक्त घ

Karn Sharma : कर्ण शर्माची क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेटपटू कर्ण शर्माने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली आहे. यूपी टी२० लीग

Colombo Test : कोलंबो कसोटीत पहिल्या दिवशी भारताची त्रिशतकी मजल, पडिक्कलचे शतक आणि गिलचे अर्धशतक

कोलंबो : देवदत्त पडिक्कलच्या सलग दुसऱ्या कसोटी शतकाच्या जोरावर भारताने श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या

Shubman Gill : शुभमन गिलच्या कसोटी क्रिकेटमध्ये ३,००० धावा पूर्ण

कोलंबो : भारतीय क्रिकेट संघाचा कसोटी आणि एकदिवसीय कर्णधार,

AUS vs BAN : मिचेल स्टार्कची कमाल, ऑस्ट्रेलियाने मॅके कसोटी एक डाव आणि ५१ धावांनी जिंकली

मॅके : मिचेल स्टार्कने घेतलेल्या एकूण १० बळींच्या (मॅचमधील दोन्ही डावांत मिळून) जोरावर ऑस्ट्रेलियाने

Ind vs SL 2nd Test Yashasvi Jaiswal : यशस्वी जयस्वालला बाद केल्यानंतर मैदानातच राडा; फर्नांडोसोबत जोरदार बाचाबाची

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच सत्रात मैदानावरील वातावरण चांगलेच