मराठमोळ्या लग्नांमध्ये आता परदेशी पदार्थांची रंगत

अमरावती : गोष्ट पदार्थाचे खास असतेच; पण आता भारतीय पदार्थ व चीनमधील खास पदार्थांना एकत्र करून फ्यूजन टेस्ट बनविली जात आहे. तसेच, मराठमोळी लग्नातील सुरुची भोजनात पिझ्झा व पास्ताचाही शिरकाव झाला आहे. हेच यंदाच्या लग्नसराईचे वैशिष्ट्य ठरत आहे. खवय्येही या नवीन चवीचा मनसोक्त आनंद घेत आहेत.


लग्न किती थाटामाटात करा, डोळे दिपविणारी भव्य-दिव्य सजावट, संगीत पार्टी, महागडे रिटर्न गिफ्ट सर्व काही करा त्याचे कौतुक होणारच; पण जेवणाची भट्टी जमली नाही, तर सर्वांचा हिरमोड होऊ शकतो. शेवटी लग्न सोहळ्याची संपूर्ण मदार 'जेवणा'वरच असते. जेवण फक्कड असेल, तर वधूपक्षाचे व केटरर्सचे पाहुण्यांकडून कौतुक होते. देशी-विदेशी व्यंजनांचा घेता येतो आस्वाद

शहरात शाही लग्न सोहळे पार पडत आहेत. यात देशी-विदेशी पदार्थांचे २७ पेक्षा अधिक प्रकार व ३९ पेक्षा अधिक काउंटर खवय्यांसाठी पर्वणीच ठरत आहे. यात युरोपियन, मेक्सिकन, जपानी, चिनी देशातील प्रसिद्ध पदार्थांचे स्टॉल आहेत. थंडीचे दिवस लक्षात घेऊन स्ट्रीम फूड व लाइव्ह काउंटर फूड स्टॉलला मागणी वाढली आहे.


आता यात केटरर्सनी आणखी नावीन्य आणले आहे. दोन देशांतील प्रसिद्ध पदार्थ एकत्र करून नवीन डिश तयार केली जात आहे. दक्षिण भारतातील पदार्थ व त्यात चायनीज पदार्थ मिक्स करणे किंवा इटालियन व चायनीज पदार्थ मिक्स केल्याने फ्यूजन टेस्टचा आनंद पाहुण्यांना मिळत आहे.

Comments
Add Comment

Homemade Chyawanprash: देशी च्यवनप्राश हिवाळ्यात वारंवार होणारे आजार टाळेल घरगुती, जाणून घ्या सोपी रेसिपी

मुंबई : हिवाळा ऋतूमध्ये खोकला, सर्दी आणि अशक्तपणाच्या तक्रारी येतात. मजबूत प्रतिकारशक्ती राखणे अत्यंत महत्वाचे

वजन कमी आणि सौंदर्यासाठी आवळ्याचा जादुई फॉर्म्युला

मुंबई : शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य आणि संतुलित पोषण मिळणे अत्यंत आवश्यक असते. व्हिटॅमिन सी आणि

थंडीत डोळ्यांची काळजी घ्या...

ठाणे : थंडी वाढणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले असून या काळात शरीरासोबतच डोळ्यांचीही विशेष काळजी घेणे

उकडलेला बटाटा आहे आरोग्यासाठी उत्तम !

मुंबई : दैनंदिन आहारात बटाटा ही एक नेहमीची भाजी असते, पण बहुतांश लोक तो तळून किंवा शिजवून खातात. मात्र तळलेल्या

भाग्यश्रीचा फिटनेस मंत्र: वजन कमी करण्यासाठी 'बुलेटप्रूफ कॉफी'ची शिफारस!

मुंबई: आपल्या फिटनेस आणि सुंदर त्वचेसाठी नेहमी चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्री हिने नुकताच तिच्या

दररोजच्या जीवनातील ताण आणि चिंता कमी करण्यासाठी ही आसने करतील तुम्हाला मदत

मुंबई : दररोज योगाभ्यास करुन ताणतणावाचे व्यवस्थित व्यवस्थापन करणे शक्य आहे. यामुळेच आजच्या धकाधकीच्या जीवनात