Saturday, February 8, 2025
Homeताज्या घडामोडीअमेरिकेत ७.० रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, त्सुनामीचाही इशारा

अमेरिकेत ७.० रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, त्सुनामीचाही इशारा

कॅलिफोर्निया: अमेरिकेतील उत्तरी कॅलिफोर्नियामध्ये गुरुवारी (९ डिसेंबर) भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. पॅसिफिक समुद्राच्या किनारी क्षेत्रामध्ये असणाऱ्या हम्बोल्ट काऊंटी इथं असणाऱ्या फर्नडेल नावाच्या एका लहान शहरामध्ये गुरुवारी सकाळी १०.४४ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले.

युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हे (USGS) ने सांगितले की, रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता ७.० एवढी होती. भूकंपानंतर लगेचच, इथं त्सुनामीचा इशाराही देण्यात आला आहे. मात्र काही वेळाने तो रद्द करण्यात आला.

https://prahaar.in/2024/12/06/permanent-ban-on-the-manufacture-and-sale-of-nylon-manja-threads/

७.० रिश्टर स्केलच्या या भूकंपाने उत्तर कॅलिफोर्नियाचा मोठा भाग हादरला. मोठ्या धक्क्यांनतंरही या भागामध्ये सातत्यानं धरणीकंप जाणवत होते असं स्थानिकाचं म्हणणं आहे. कॅलनफोर्नियात ७.० ते ७.३ रिश्टर स्केलचा भयावह भूकंप आल्यानंतर यंत्रणांनी त्यासंदर्भातील माहिती जारी केली. फर्नडेलपासून जवळपास १०० किमी पश्चिम ते दक्षिण पश्चिमेला १० किमी (६.२१ मैल) खोलवर या भूकंपाचा केंद्रबिंदू आढळला. भूकंप इतका जोरदार होता की इमारती हादरल्या. या भूकंपाची एकंदर तीव्रता पाहता या भागामध्ये त्सुनामीचाही इशारा देण्यात आला आहे. गुरुवारी आलेल्या या भूकंपानंतर कॅलिफोर्नियातील किनारपट्टी भागामध्ये त्सुनामीचाही इशारा देण्यात आला आहे.

प्राथमिक माहितीनुसार सध्याच्या घडीला समुद्रात घातल लाटांची निर्मिती होत नसली तरीही त्सुनामीचा इशारा देत या क्षेत्रातील किनारपट्टी भागामध्ये राहणाऱ्यांनात सतर्क करण्यात आलं आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू असणाऱ्या ठिकाणापासून साधारण ३०० किमीपर्यंतच्या अंतरापर्यंत हा इशारा लागू असल्याचं सांगण्यात आलं होतं. कालांतरानं हा इशारा मागे घेण्यात आला असला तरीही सावधगिरी बाळगण्याचा सल्ला मात्र यंत्रणांकडून दिला जात आहे. ७.० रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेच्या भूकंपानंतर सॅन फ्रान्सिस्को आणि ऑकलंडदरम्यान असणारा समुद्रातून जाणारा भुयारी मार्गही बंद करण्यात आला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -