ठाणे : मुंबई-अहमदाबाद धावणाऱ्या बुलेट ट्रेनच्या (Mumbai Bullet Train) कामाने वेग घेतला असून, बुलेट ट्रेन स्टेशनचा मुंबईत पहिला काँक्रीट बेस स्लॅब नुकताच जमिनीपासून अंदाजे ३२ मीटर खोलीवर टाकण्यात आला, जो १० मजली इमारतीच्या समतुल्य आहे. स्टेशनचे बांधकाम तळापासून वरच्या पद्धतीने केले जात आहे, म्हणजेच जमिनीपासून खोदाईचे काम सुरू झाले असून पायापासून काँक्रिटीकरणाचे कामही वेगाने सुरू झाले आहे.
भारतात पहिल्या धावणाऱ्या बुलेट ट्रेनचा प्रकल्पाचा शिवधनुष्य सरकारने चांगल्या पद्धतीने पेलला आहे. गेल्या काही दिवसांत बुलेट ट्रेनच्या काम वेगवान गतीने सुरू आहे. ट्रेनसाठी स्लॅबचे बांधकाम चालू असून, पहिला क्राँक्रीटचा स्लॅब ३.५ मीटर खोल, ३० मीटर लांब आणि २० मीटर रुंद आहे. स्टेशनसाठी टाकल्या जाणाऱ्या ६९ स्लॅबपैकी हा पहिला आहे, जो बुलेट ट्रेन स्टेशनसाठी सर्वात खोल बांधकाम पातळी बनवेल.
मुंबई बुलेट ट्रेन स्टेशन वांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथे स्थित असू मुंबई-अहमदाबाद एचएसआर रेल्वे मार्गावरील एकमेव भुयारी स्टेशन आहे. हा प्लॅटफॉर्म जमिनीपासून सुमारे २४ मीटर खोलीवर नियोजित करण्यात आले आहे. या प्लॅटफॉर्ममध्ये प्लॅटफॉर्म मजला, संकुल मजला आणि सेवा मजला असे तीन मजले असतील. संबंधित कामासाठी सध्या जमिनीपासून ३२ मीटर खोलीपर्यंत उत्खनन केले जात आहे. स्टेशनमध्ये ६ प्लॅटफॉर्म असतील व प्रत्येक प्लॅटफॉर्मची लांबी सुमारे ४१५ मीटर असेल (१६ कोचांच्या बुलेट ट्रेनसाठी पुरेशी). स्टेशनला मेट्रो आणि रस्त्याद्वारे जोडणी दिली जाईल.
प्रत्येकी १२० एम ३ क्षमतेच्या दोन इन-सिटू बॅचिंग प्लांटद्वारे काँक्रीटचा पुरवठा केला जात आहे. काँक्रीट ओतण्याच्या वेळी तापमान २५ अंश सेल्सिअसच्या खाली ठेवण्यासाठी इन-सिटू बर्फ आणि चिलर प्लांटद्वारे तापमान नियंत्रित केले जात आहे. तसेच स्लॅब टाकण्यापूर्वी पुरेशा जलरोधक उपायांची खात्री केली आहे.
मुंबई : आपण अनेक चित्रपटांची गाणी ऐकली आणि बघितली असतील. भारतीय चित्रपटात गाणी नसतील तर…
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे.…
मुंबई(ज्ञानेश सावंत):सुरवातीच्या सामन्यात चेन्नईने मुंबईला फिरकीच्या जोरावर पराभवाचे पाणी पाजले. परंतु तो सामना चेन्नईच्या घरच्या…
पूजा काळे सृष्टीचे तत्त्व सांभाळा, नेहमीची येतो उन्हाळा. वर्षभरात तीन ऋतूंच्या तीन तऱ्हा सांभाळताना होणारा…
पुणे : काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात अध्यक्ष बदलला आहे. हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत.…
डॉ. वीणा सानेकर भाषा हा शिक्षणातील पायाभूत घटक आहे. ती माणसाच्या अस्तित्वाची ओळख असल्यामुळे शिक्षणातील…