
मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज शपथ घेतली. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीआधी मुख्यमंत्र्यांनी पहिली स्वाक्षरी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या फाईलवर केली. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून पुणे येथील रुग्ण चंद्रकांत शंकर कुऱ्हाडे यांना बोन मॅरो ट्रान्सप्लांटसाठी ५ लाखाची मदत देण्याचे निर्देश त्यांनी फाईलवर दिले आहेत. चंद्रकांत कुऱ्हाडे यांच्या पत्नीने बोन मॅरो ट्रान्सप्लांट उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अर्थसहाय्य देण्याची विनंती केली होती. राज्य मंत्रिमंडळ बैठकीच्या प्रारंभी मुख्य सचिव सुजाता सैनिक यांच्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shidne) ,उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

मुंबई : राज्यात आता देवेंद्रपर्वाला सुरुवात झाली आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ (Oath Ceremony) घेतली असून अजित पवारांनी ...
पहिली स्वाक्षरी रुग्णाच्या फाईलवर
मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी पहिली स्वाक्षरी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या फाईलवर केली. पुणे येथील रुग्ण चंद्रकांत शंकर कुऱ्हाडे यांना पाच लाखाची मदत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून देण्याचे निर्देश त्यांनी फाईलवर दिले आहेत. चंद्रकांत कुऱ्हाडे यांच्या पत्नीने बोन मॅरो ट्रान्सप्लांट उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अर्थसहाय्य देण्याची विनंती केली होती.