Monday, August 4, 2025

Pushpa 2 : अल्लू अर्जुनला पाहण्यासाठी चाहत्यांची झुंबड; चेंगराचेंगरीत महिलेचा मृत्यू!

Pushpa 2 : अल्लू अर्जुनला पाहण्यासाठी चाहत्यांची झुंबड; चेंगराचेंगरीत महिलेचा मृत्यू!

हैदराबाद : अल्लू अर्जुनचा बहुचर्चित चित्रपट 'पुष्पा २'हा (Pushpa 2) सिनेमा येत्या ५ डिसेंबर रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच पुष्पा २ने धुमाकूळ घातला आहे. अशातच काल हैदराबादमध्ये पुष्पा २चा प्रीमियर आयोजित करण्यात आला होता. परंतु यावेळी प्रीमियर ठिकाणी चाहत्यांची मोठी गर्दी झाली असून यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.



नेमके प्रकरण काय?


हैदराबादमध्ये आयोजित करण्यात आलेला पुष्पा २चा प्रीमियरला अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना देखील उपस्थित होते. यावेळी त्या दोघांची झालक पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये मोठी झुंबड झाली होती.


दिलसुखनगर येथे राहणारी रेवती, पती भास्कर आणि त्यांची दोन मुले श्रीतेज (९) आणि सान्विका (७) यांच्यासोबत 'पुष्पा २' चा प्रीमियर शो पाहण्यासाठी आली होती. गर्दी गेटमधून ढकलत असताना रेवती आणि तिचा मुलगा श्रीतेज बेशुद्ध पडले. तसेच पीडित महिला (३९) ही थिएटरमध्ये बेशुद्ध पडली होती आणि तिला उपचारासाठी दुर्गाबाई देशमुख रुग्णालयात आणण्यात आले होते. मात्र, तेथे पोहोचल्यावर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. तर दोन्ही मुले जखमी झाले आहेत.




Comments
Add Comment