'दगडू' फेम प्रथमेश परबच्या 'श्री गणेशा' चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई : रोड ट्रीप म्हटली की, धमाल, मजा आणि मस्ती... वेळोवेळी सर्वांनीच अशा प्रकारची रोड ट्रीप अनुभवली असेल, पण आता हा आनंद मोठ्या पडद्यावर लुटण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. 'श्री गणेशा' हा मराठीतील आगळावेगळा रोड मूव्ही प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाला आहे. 'श्री गणेशा' या आगामी मराठी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. हास्य-विनोद आणि गंमती-जंमतीची मेजवानी असलेल्या या मराठी फॅमिली एन्टरटेनर रोड मुव्हीची ट्रेलरमधील झलक उत्सुकता वाढवणारी आहे. हा चित्रपट २० डिसेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.


'श्री गणेशा' धमाल रोड ट्रीपचा आणि 'श्री गणेशा' फॅमिली एंटरटेनमेंटचा' असे म्हणत खऱ्या अर्थाने रोड ट्रीपच्या रोलर कोस्टर राईडवर नेणाऱ्या 'श्री गणेशा' या फॅमिली एंटरटेनमेंटची प्रस्तुती एमएच-१२ सिने मीडियाने आऊट ऑफ द बॅाक्स फिल्म्सच्या सहयोगाने केली आहे. संजय माणिक भोसले आणि कांचन संजय भोसले या चित्रपटाचे निर्माते असून, या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शक मिलिंद कवडे पुन्हा एकदा लाफ्टर आणि मॅडनेसचा डबल धमाका करणार आहेत. रवि माणिक भोसले आणि महेश माणिक भोसले या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. ट्रेलरची सुरुवातच संजय नार्वेकरने साकारलेल्या भाई वेंगुर्लेकर या व्यक्तिरेखेपासून होते. संजयसोबत शशांक शेंडे आणि प्रथमेश परब हे मुख्य भूमिकेतील कलाकारही आहेत. त्यानंतर 'रस्ता कसाही असला...' गाण्याद्वारे नयनरम्य लोकेशन्सची सफर घडते. फूड ब्लॅागर असलेल्या नायिकेची म्हणजेच मेघा शिंदेची एन्ट्री होते आणि ट्रेलरचा प्रवास पुढे सुरू होतो.


 


'आली मधुबाला...' गाण्याचा तडकाही ट्रेलरला आहेच. हा चित्रपट केवळ धमाल-मस्ती नसून, याला पिता-पुत्राच्या नात्याची किनारही जोडण्यात आल्याने 'उन-सावलीचा चाले खेळ...' हे गाणे येताच जाणवते. 'कारण बाप असतो आवाक्याबाहेर, कधीच कोणाला कळत नाही', हा डायलॅाग मनाला भिडतो. ट्रेलरच्या शेवटी पुन्हा संजय नार्वेकरचे कॅरेक्टर आपल्या अनोख्या शैलीत भेटतो. प्रदर्शित करण्यात आलेला ट्रेलर खऱ्या अर्थाने प्रेक्षकांना 'श्री गणेशा' चित्रपटामध्ये काय पाहायला मिळणार याची झलक दाखवणारा असून, चित्रपटाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचवणारा असल्याचे मत दिग्दर्शक मिलिंद कवडे यांनी व्यक्त केले आहे.


'श्री गणेशा' चित्रपटाची कथा मिलिंद कवडे यांनी लिहिली आहे. मिलिंद यांनीच संजय नवगिरे यांच्या साथीने पटकथालेखनही केले आहे. संवाद लेखनाची जबाबदारी संजय नवगिरे यांनी सांभाळली आहे. डीओपी हजरत शेख वली यांनी सिनेमॅटोग्राफी, तर संकलन गुरु पाटील यांनी केले आहे. गीतकार जय अत्रे आणि मंदार चोळकर यांनी लिहिलेल्या गीतांना संगीतकार वरुण लिखते यांनी संगीत दिले असून, पार्श्वसंगीत अभिनय जगताप यांचे आहे. कला दिग्दर्शन सुमित पाटील यांचे असून, नृत्य दिग्दर्शन राहुल ठोंबरे यांचे आहे. दिपक एस. कुदळे (पाटील) या चित्रपटाचे कार्यकारी निर्माता असून विनोद शिंदे यांनी सहदिग्दर्शन केले आहे.

Comments
Add Comment

Multiplex : स्पायडरमॅन सिनेमावर कुशल बद्रिके नाराज ; नक्की कारण काय ?

उत्तम कलाकृतींना नेहमीच अमाप प्रेम देणाऱ्या प्रेक्षकांनी मराठी चित्रपटांना नेहमीच चांगला प्रतिसाद दिला आहे.

Rashmika Mandanna Injured : शूटिंगदरम्यान रश्मिका मंदानाला गंभीर दुखापत; ६ आठवडे विश्रांतीचा सल्ला!

मुंबई : दाक्षिणात्य आणि बॉलिवूड चित्रपटसृष्टीची लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) हिच्या चाहत्यांसाठी

Salman Khan and Sanjay Dutt : सलमान खानची संजय दत्तसाठी भावुक पोस्ट; मिठी मारतानाचा फोटो व्हायरल, नेटकरी म्हणाले...

मुंबई : बॉलिवूडमध्ये मैत्रीची उदाहरणे दिली जातात, तेव्हा सलमान खान (Salman Khan) आणि संजय दत्त (Sanjay Dutt) यांचे नाव सर्वात वर

Mansoon Hacks : पावसाळ्यात फ्रिजमध्ये पाणी जमा होतंय ? मग करा हा उपाय

पावसाळ्यात एक समस्या घरोघरी दिसून येते ती म्हणजे फ्रिजमध्ये पाणी जमा होणे. कधी भाज्यांच्या ट्रेमध्ये पाणी जमा

Mirzapur The Movie : 'मिर्झापूर: द मूव्ही'चा देशभर भौकाल! ट्रेलरनंतर 7-8 शहरांमध्ये मेगा प्रमोशन; चाहत्यांच्या भेटीला पोहोचणार स्टारकास्ट

 Mirzapur The Movie : अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर 'मिर्झापूर: द मूव्ही'चा दमदार टीझर प्रदर्शित झाला असून, आता

सचिन पिळगावकर यांनी सांगितला गौप्यस्फोट "मी म्हातारा होणार नाही..." संजीव कुमार यांच्या निधनामागचे आणि गूढ भविष्याचे रहस्य

मुंबई: बॉलिवूडमध्ये आपल्या दमदार आणि अप्रतिम अभिनयाचा अमीट छाप सोडणारे ज्येष्ठ अभिनेते संजीव कुमार (Sanjeev Kumar) यांचे