Monday, February 17, 2025
Homeताज्या घडामोडीRavi Tandon : रविना टंडनची मुलगी करतेय 'या' भारतीय क्रिकेटपटूला डेट

Ravi Tandon : रविना टंडनची मुलगी करतेय ‘या’ भारतीय क्रिकेटपटूला डेट

मुंबई : क्रिकेट आणि बॉलिवूडचे लव्ह कनेक्शन हे जुने आहे. क्रिकेट आणि बॉलीवूडमधल्या लव्ह स्टोरीं नेहमीच चर्चेत राहत असतात. आता बॉलीवूडची अभिनेत्री रवीना टंडनच्या मुलीचे नावही एका भारताच्या क्रिकेटपटूबरोबर जोडले जात आहे. या दोघांच्या नावाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.

हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रवीना टंडनला भारतात सगळेच ओळखतात. मात्र तिची मुलगी राशा थडानीला फार कोणी ओळखत नाही. मात्र लवकरच राशा बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारा आहे. चित्रपटात पदार्पण करण्याआधीच राशाचं नाव एका वेगळ्या विषयासाठी चर्चेत येत आहे. राशा थडानी हिचे नाव एका क्रिकेटपटू सोबत जोडण्यात येत आहे. तो क्रिकेटपटू म्हणजे कुलदीप यादव आहे. राशा आणि कुलदीप एकमेकांना डेट करत असल्याचं बोललं जात आहे. कुलदीप आणि राशा एकमेकांना फॉलो देखील करतात. शिवाय, राशा थडानी आणि कुलदीप यादव याचे सोशल मीडियावर लाईक्स सुरु आहेत. पण आपण एकमेकांना डेट करतो की नाही, याबाबत या दोघांनीही काहीच म्हटलेले नाही. पण सोशल मीडियावर मात्र या दोघांच्या अफेअर्सची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पालिका सज्ज

राशा ही लवकरच बॉलीवूडमध्ये पदार्पण करण आहे. अजय देवगणबरोबर तिचा एक नवीन सिनेमा येणार आहे. या चित्रपटाने नाव आझाद असे आहे. तर कुलदीप हा दुखापत झाल्याने सध्याच्या घडीला भारतीय संघात नाही. तो उपचार घेण्यासाठी जर्मनीला गेला होता. पण आता कुलदीप दुखापतीमधून सावरला आहे आणि तो लवकरच भारतीय संघात दिसेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. त्यामध्येच आता राशा थडानीला कुलदीप यादव डेट करत असल्याचे म्हटले जात आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -