मुंबई: तेलंगणामध्ये बुधवारी ४ डिसेंबरला सकाळी सकाळी भूकंपाचे(Earthquake) जोरदार झटके बसले. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या माहितीनुसार तेलंगणामधील मुलुग जिल्ह्यात सकाळी सकाळीच ५.३ रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले. यामुळे हैदराबादमध्येही हादरे जाणवले. सकाळी ७.२७ वाजण्याच्या सुमारास हे भूकंपाचे धक्के बसले. याचे केंद्र जमिनीपासून ४० किमी खोल होते.
भूकंपाचे हे धक्के महाराष्ट्र आणि छत्तिसगडमधीलही काही परिसरात जाणवले. भूकंपाच्या या जोरदार झटक्यांमुळे अद्याप कोणत्याही प्रकारची जिवित अथवा वित्त हानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. अधिकारी परिस्थितीचे आकलन करत आहेत. तसेच तज्ञांनी स्थानिक लोकांना भूकंपादरम्यान सतर्क आणि गर्दीच्या ठिकाणांपासून तसेच असुरक्षित इमारतींपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.