Tuesday, May 13, 2025

महाराष्ट्रराजकीयमहत्वाची बातमी

Oath Ceremony 2024 : उद्याच्या शपथविधी सोहळ्यात पंतप्रधानांसह २२ राज्यातील मुख्यमंत्री राहणार उपस्थित

Oath Ceremony 2024 : उद्याच्या शपथविधी सोहळ्यात पंतप्रधानांसह २२ राज्यातील मुख्यमंत्री राहणार उपस्थित

मुंबई : मुंबईत आज भाजपाच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची एकमुखाने निवड करण्यात आली.अखेर उद्या मुंबईतल्या आझाद मैदानावर नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट झालं आहे. १३२ जागा जिंकून भाजप हा राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरल्यामुळे मुख्यमंत्री देखील भाजपचाच होणार हे जवळपास निश्चित झालं आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांचे नाव महायुतीकडून ठरल्यानंतर कार्यकर्त्यांसह नेत्यांमध्ये प्रचंड उत्साह आणि आनंद दिसतोय.उद्या मुंबईतील आझाद मैदानवर राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री शपथ घेणार आहे. दरम्यान, महायुतीतील अनेक प्रमुख नेते राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनावर दाखल झाले आहेत. महायुतीकडून या भेटीत सत्तास्थापनेचा दावा केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.



दरम्याान, भाजप विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्यानंतर आता घडामोडी वेगानं घडताना दिसत आहेत. महायुतीमधील प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची एक महत्त्वाची बैठक शिंदेंच्या वर्षा बंगल्यावर पार पडली. या बैठकीनंतर आता राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा करण्यात आला आहे. संख्याबळासाठी आमदारांच्या सह्यांचं पत्र राज्यापालांना देण्यात आलं आहे. देवेंद्र फडणीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे या महायुतीमधील प्रमुख नेत्यांनी राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा केला आहे.





उद्या शपथविधी



उद्या महायुती सरकारचा शपथविधी होणार आहे. मुंबईतील आझाद मैदानावर हा शपथविधी होणार आहे. या शपथविधीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह केंद्रातील अनेक मंत्री उपस्थित राहणार आहेत. तब्बल २२ राज्यातील मुख्यमंत्री या शपथविधी सोहळ्यासाठी हजेरी लावणार आहेत. विशेष म्हणजे या शपथविधी सोहळ्यासाठी लाडक्या बहिणींना विशेष निमंत्रण देण्यात आलं आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी तब्बल ४० हजार लोकांची उपस्थिती राहणार आहे.

Comments
Add Comment