कोअर कमिटीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला मंजूरी
मुंबई : पक्षनिरीक्षक आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या उपस्थितीत कोअर कमिटीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे.
चंद्रकांत पाटील यांनी विधीमंडळ गटनेतेपदी फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला.
संजय कुटेंकडून फडणवीसांच्या नावाला अनुमोदन.
पंकजा मुंडेंकडून फडणवीसांच्या नावाला अनुमोदन.
रवींद्र चव्हाणांकडून फडणवीसांच्या नावाला अनुमोदन.
योगेश सागरांकडून फडणवीसांच्या नावाला अनुमोदन.