रविवारपर्यंत ठाण्यातील वेगवेगळ्या भागात २४ तासांसाठी पाणी पुरवठा बंद

  74

ठाणे:  बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून ठाणे महापालिकेस मिळणाऱ्या पाणी पुरवठ्यात कपात झाली आहे. तसेच, या दुरूस्तीच्या कामामुळे बंधाऱ्यातील पाण्याची पातळीही कमी झाल्याने ठाणे महापालिकेस होणाऱ्या पाणी पुरवठ्यातही घट झाली आहे. अशा एकूण सुमारे ३० टक्के पाणी कपातीमुळे पुढील आठवडाभर ठाणे महापालिका क्षेत्रात वेगवेगळ्या भागात २४ तासांसाठी पाणी पुरवठा बंद ठेवून पाणी वितरणाचे नियोजन करण्यात येणार आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे पाणी पुरवठा करणाऱ्या पिसे येथील 'न्यूमॅटिक गेट सिस्टिम'मध्ये बिघाड झाला आहे. त्याच्या दुरुस्तीचे काम रविवार, ०१ डिसेंबरपासून सुरू झाले असून या तातडीची तांत्रिक दुरुस्तीच्या कामामुळे ०५ डिसेंबरपर्यंत पाणी पुरवठ्यात कपात झाली आहे. ही दुरूस्ती आणि भातसा नदीच्या बंधाऱ्यातील पाण्याची कमी करण्यात आलेली पातळी यामुळे एकूण ३० टक्के पाणी कपातीचा ठाणे महापालिकेस सामना करावा लागत आहे.

या परिस्थितीत, संपूर्ण महापालिका क्षेत्रास दररोज ३० टक्के पाणी कपातीचा सामना करावा लागू नये, यासाठी विभागवार स.९.०० ते दुसऱ्या दिवशी सकाळी ९.०० या वेळेत एकेका विभागाचा पाणी पुरवठा २४ तासांसाठी बंद करण्यात येणार आहे.




नागरिकांनी दुरुस्तीच्या या काळात तसेच पाणी पुरवठा सुरळीत होईपर्यंत खबरदारीचा उपाय म्हणून पाणी काटकसरीने वापरून महानगरपालिकेस सहकार्य करावे, अशी आवाहन करण्यात आले आहे.



दिनांक आणि पाणी पुरवठा बंद असणारे विभाग : 


मंगळवार, ०३ डिसेंबर -
माजिवडा, मानपाडा, कोठारी कम्पाऊंड, ढोकाळी, मनोरमा नगर, रुणवाल, डोंगरी पाडा, विजय नगरी, विजय पार्क, वाघबीळ, आनंद नगर, कासारवडवली

बुधवार, ०४ डिसेंबर -
गांधी नगर, सुभाष नगर, नळपाडा, वसंत विहार, लोकपूरम, लोक उपवन, एमएमआरडीए, तुळशीधाम, सुरकरपाडा, सिद्धांचल, कोंकणीपाडा, गावंड बाग, उन्नती, शास्त्री नगर १ व २, मैत्री पार्क

गुरूवार, ०५ डिसेंबर -
सिद्धेश्वर, चंदनवाडी, पाटीलवाडी, चरई, मावळी मंडळ, कोलबाड, गोकूळ नगर, आझाद नगर, खोपट, सिव्हील हॉस्पिटल परिसर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड परिसर

शुक्रवार, ०६ डिसेंबर -
दत्तवाडी, बॉम्बे कॉलनी, जीवन बाग, मुंब्रा देवी, शैलेश नगर, उदय नगर, रेतीबंदर, सम्राट नगर, नारायण नगर, मेक कंपनी, जलकुंभ ते शंकर मंदिर, संजय नगर परिसर

शनिवार, ०७ डिसेंबर -
राबोडी १ व २, आकाशगंगा, जेल टाकी परिसर, जरी मरी, वृंदावन, श्रीरंग, विकास कॉम्प्लेक्स, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, कळवा, मनिषा नगर, आतकोणेश्वर नगर, भास्कर नगर, पौड पाडा, खारेगाव, रघुकुल, पारसिक नगर

रविवार, ०८ डिसेंबर -
लोकमान्य पाडा नं. १, २, दोस्ती, वेदांत, आकृती संकुल, अरुण क्रीडा मंडळ, मनोरुग्णालय परिसर, रहेजा, कशिश पार्क, शिवाजी नगर, धर्मवीर नगर, साठेवाडी, रघुनाथ नगर, इटर्निटी, विष्णूनगर, भास्कर कॉलनी, ब्राम्हण सोसायटी, घंटाळी, राम मारूती रोड

Comments
Add Comment

अरे बापरे! पुण्यात हे चाललंय तरी काय? घरात घुसून डिलिव्हरी बॉयकडून तरुणीवर बलात्कार!

पुणे: पुणे शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. कोंढवा भागातील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये

राशिचक्रकार शरद उपाध्याय यांचा निलेश साबळेंवर निशाणा.. म्हणतात 'गर्विष्ठ... '

झी मराठीवरील एक दशक एका कार्यक्रमाने गाजवलं आणि तो कार्यक्रम म्हणजे 'चला हवा येऊ द्या'च पाहिलं पर्व. या

तृतीय पंथीयांनाही एसटीत ५० टक्के सवलत

मुंबई : महिलांना एसटीच्या प्रवासात ५० टक्के सवलत दिल्यानंतर आता राज्यातील तृतीय पंथीयांनाही एसटीच्या प्रवासात

पेंग्विनच्या देखभालीवर २५ कोटी खर्च

मुंबई (प्रतिनिधी) : भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहायलातील (राणीची बाग)

जीएसटीच्या १२ टक्के स्लॅबमध्ये बदलाची शक्यता, केंद्रीय अर्थमंत्र्यांनी मुलाखतीत दिले संकेत

नवी दिल्ली : केंद्र सरकारने १२ टक्के जीएसटी स्लॅबमधील वस्तूंचा ५ टक्क्यांच्या स्लॅबमध्ये समावेश करण्याची तयारी

साई मंदिरात करोडोंच्या श्रद्धेवर दरोडा !

शिर्डी :  जगभरातील कोट्यवधी साईभक्तांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू असलेल्या शिर्डीच्या साई मंदिरात चोरट्यांचा