Wednesday, January 15, 2025
Homeताज्या घडामोडीJalgaon Car Crash : जळगावात भीषण अपघात, दाम्पत्याचा जागीच मृत्यू

Jalgaon Car Crash : जळगावात भीषण अपघात, दाम्पत्याचा जागीच मृत्यू

जळगाव : पारोळा तालुक्यातील म्हसवे गावाजवळील लोणी गावाकडे जाणाऱ्या वळणावर राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात दापंत्य ठार झाल्याची घटनास्थळी घडली. भरधाव वेगाने येणाऱ्या कारने समोरून येणाऱ्या कारला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघातात कारमधील दाम्पत्य जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे.

सुधीर देवीदास पाटील (वय ४८) आणि त्यांची पत्नी ज्योती सुधीर पाटील (वय ४४) दोन्ही रा. लोणी ता. पारोळा ह.मु. गुजरात राज्य असे मयत झालेल्या दाम्पत्याची नावे आहे. पारोळा तालुक्यातील लोणी गावातील रहिवाशी असलेले सुधीर पाटील हे आपल्या पत्नी ज्योती पाटील यांच्यासह गुजरात राज्यात वास्तव्याला होते.

Eknath Shinde Health : शपथविधीची तयारी पण शिंदे पडलेत आजारी, उद्याच होणार सर्व घडामोडी

दरम्यान, लोणी गावातील नातेवाईकांचे ४ डिसेंबर रोजी लग्न असल्याने पाटील दाम्पत्य हे मुळ गावी जाण्यासाठी गुजरात राज्यातून आलेले होते. पारोळा तालुक्यातील म्हसवे गावातील फाट्याजवळ सुधीर पाटील हे कार क्रमांक (जीजे ०५ आरएच १२४७) ने लोणी गावी जाण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावरून पाटील हे कार वळवत असतांना जळगावकडून धुळेकडे जाणारी भरधाव वेगाने जाणारी ऑडी कार क्रमांक (डीडी ०३ के ६९०३) ने जोरदार धडक दिली. या धडकेत गुजरात येथून कारमध्ये आलेले दाम्पत्य जागीच ठार झाले. हा अपघात इतका भीषण होता की, गुजरात पासींग असलेली कारचा पुर्णपणे चुराडा झाला आहे. तर ऑडी कारमधील जखमींना तातडीने एरंडोल गामीण रूग्णालयात तातडीने एरंडोल ग्रामीण रूग्णालयात हलविण्यात आले आहे. पारोळा तालुक्यातील म्हसवे गावाजवळील लोणी फाट्याजवळ ही घटना घडल्यानंतर दोन जण जागीच ठार झाल्याची घटना घडली.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक नागरीकांनी एरंडोल ते धुळे दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या आंदोलन करण्यात आल्याचे दिसून आले. यावेळी राष्ट्रीय महामार्गाला लागून समांतर रस्ता करण्यात यावी अशी अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. वारंवार अश्या घटना होत असल्याने अनेकांची जीव जात आहे. मात्र, प्रत्यक्षात दोन जण जागीच ठार झाले आहे. त्यामुळे आम्हाला समांतर रस्त्यांसाठी रास्तारोको आंदोलन करण्याची वेळ आली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -