मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील जनतेला नव्या सरकार स्थापनेची प्रतीक्षा लागून राहिली आहे. नव्या सरकारचे मंत्रीमंडळ कसे असेल, कोण असेल मंत्री, मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर कोण बसेल, उपमुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडेल या साऱ्याच प्रश्नांची उत्तरे अद्याप अनुत्तरित आहेत.
त्याच एनसीपी प्रमुख अजित पवार(Ajit Pawar) हे दिल्लीत गेल्याने राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र दिल्लीत अमित शाहांच्या(Amit Shah) भेटीसाठी गेलेल्या अजित पवारांना मात्र ताटकळत राहावे लागले.
सोमवारी अजित पवार अमित शाहांना भेटण्यासाठी दिल्लीत गेले होते. मात्र अमित शाह अजित पवांरांना न भेटताच परस्पर चंदीगडला निघून गेले. चंदीगडमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह उपस्थित होते.
Maharashtra CM: शिंदे दिलदार नेते, महायुती सरकारमध्ये त्यांचा मान राखला गेला पाहिजे – केसरकर
अमित शाह चंदीगडला निघून गेल्याने अजित पवारांवर मात्र ताटकळत बसण्याची वेळ आली आहे. इतकंच नव्हे तर अजित पवारांसोबत त्यांचा मुलगा पार्थ पवार, खासदार सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलही उपस्थित होते. दरम्यान, अमित शाहा यांची भेट न झाल्याने अजित पवार यांना दिल्लीतील मुक्काम वाढवावा लागणार आहे.
राजकीय वर्तुळात चर्चा
एनसीपी प्रमुख अजित पवार हे दिल्लीत गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. एकनाथ शिंदेसोबतच्या बैठका रद्द होत असताना अजित पवार हे दिल्लीला गेल्याने बऱ्याच शंका व्यक्त केल्या जात होत्या.