Wednesday, January 15, 2025
Homeताज्या घडामोडीआठवणीतल्या पहिल्या प्रेमाची गोष्ट ‘इलू इलू’

आठवणीतल्या पहिल्या प्रेमाची गोष्ट ‘इलू इलू’

मुंबई : पहिल्या प्रेमाच्या आठवणींचा एक हळवा कोपरा प्रत्येकजण आपल्या मनात सदैव जपत असतो. मनाच्या कोपऱ्यातील या गोड आठवणी आयुष्यातल्या प्रत्येक वळणावर सदैव आपल्या सोबत असतात. कधीतरी या गोड आठवणींनी मन हळवं होतं. त्या पहिल्या नजरेने, पहिल्या स्पर्शाने झालेलं ‘इलू इलू’ प्रत्येकाच्या आयुष्यात खूप खास असतं. प्रेमाच्या याच अलवार भावनेची हलकी झुळूक घेऊन प्रत्येकाच्या मनात दडलेल्या पहिल्या ‘इलू इलू’ची आठवण ताजी करायला फाळके फिल्म्स एण्टरटेन्मेंट प्रॉडक्शन आणि अजिंक्य बापू फाळके दिग्दर्शित ‘इलू इलू’ हा मराठी चित्रपट ३१ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. ‘क्षण प्रेमाचे..गोड गुलाबी आठवणींचे’…असं म्हणत या चित्रपटाचे रोमँटिक मोशन पोस्टर प्रदर्शित झाले आहे.

असं म्हणतात, ‘पहिलं प्रेम माणूस कधीच विसरत नाही,’ प्रत्येकाला त्यांच्या पहिल्या प्रेमाची आठवण करून देणारा ‘इलू इलू’ हा चित्रपट प्रत्येकाला नक्कीच नॉस्टॅलजिक करेल असा विश्वास दिग्दर्शक अजिंक्य बापू फाळके व्यक्त करतात.

PV Sindhu : पी.व्ही. सिंधू चढणार बोहोल्यावर! होणार नवरा आहे तरी कोण ?

वीणा जामकर, आरोह वेलणकर, वनिता खरात, मीरा जगन्नाथ, निशांत भावसार, श्रीकांत यादव, कमलाकर सातपुते, अंकिता लांडे, गौरव कलुस्ते, यश सणस, सोहम काळोखे, आर्या काकडे-जोशी, सिद्धेश लिंगायत हे कलाकार चित्रपटात असून हॉलीवूड आणि बॉलीवूड गाजवलेला एक लक्षवेधी चेहरा या चित्रपटातून मराठी रुपेरी पडद्यावर पदार्पण करणार आहे. हा चेहरा नेमका कोणाचा? याचा उलगडा लवकरच होणार आहे.

‘इलू इलू’ चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद नितीन विजय सुपेकर यांचे आहेत. निर्माते बाळासाहेब फाळके आणि हिंदवी फाळके तर सहनिर्माते यश मनोहर सणस आहेत. छायांकन योगेश कोळी तर संकलन नितेश राठोड यांचे आहे. वैभव जोशी, वैभव देशमुख, प्रशांत मडपुवार यांच्या गीतांना अवधूत गुप्ते, ऋषिकेश रानडे, आर्या आंबेकर, रोहित राऊत, जनार्दन खंडाळकर यांचा स्वरसाज लाभला आहे. संगीत रोहित नागभिडे, विजय गवंडे यांचे आहे. कलादिग्दर्शक योगेश इंगळे आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -