Wednesday, January 15, 2025
HomeदेशPV Sindhu : पी.व्ही. सिंधू चढणार बोहोल्यावर! होणारा नवरा आहे तरी कोण...

PV Sindhu : पी.व्ही. सिंधू चढणार बोहोल्यावर! होणारा नवरा आहे तरी कोण ?

नवी दिल्ली : भारताची प्रसिद्ध बॅडमिंटनपटू आणि दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधूच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. आपल्या उत्तम खेळाने अनेक स्पर्धांत यश मिळवणारी, भारताचं नाव उज्ज्वल करणारी स्टार खेळाडू, बॅटमिंटनपटू पी.व्ही.सिंधू आता आयुष्याची नवीन सुरुवात करणार आहे. राजस्थानमधील उदयपूर येथे २२ डिसेंबर रोजी पीव्ही सिंधूचा विवाह सोहळा पार पडणार आहे. पीव्ही सिंधूच्या वडिलांनी काल, २ डिसेंबरला सिंधूच्या लग्नाची बातमी चाहते आणि मीडियासमोबत शेअर केली. भारतीय स्टार खेळाडू पीव्ही सिंधूचं लग्न कधी होणार, कोणाशी होणार, मुलगा कोण आहे या सगळ्या गोष्टी जाणून घेण्याची चाहत्यांना भरूपर उत्सुकता आहे. चला तर मग जाणून घेऊया…

कोण आहे व्यंकट दत्ता साई?

सिंधूचे भावी पती व्यंकट दत्ता साई हे वरिष्ठ आयटी व्यावसायिक आणि पोसाइडेक्स टेक्नॉलॉजीजचे कार्यकारी संचालक आहेत. व्यंकट दत्ता साई यांचे वडील जी.टी. व्यंकटेश्वर राव हे या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत आणि ते इंडियन रेवेन्यू सर्विसमध्ये (IRS) अधिकारी आहेत. विशेष म्हणजे गेल्या महिन्यात पीव्ही सिंधूने या कंपनीचा नवीन लोगो लाँच केला होता. आता लवकरच पीव्ही सिंधू आणि व्यंकट दत्ता साई लग्नबंधनात अडकणार आहेत.पीव्ही सिंधूच्या लग्नाविषयी तिच्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. लग्नाचे कार्यक्रम २० डिसेंबरपासून सुरू होतील आणि २४  डिसेंबरला दोन्ही कुटुंबे हैदराबादमध्ये रिसेप्शनचे आयोजनही करणार आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

लेक सिटी उदयपूरमध्ये होणार विवाह

पीव्ही सिंधूने १ डिसेंबर रोजी सय्यद मोदी इंटरनॅशनल टूर्नामेंट जिंकून चाहत्यांना आनंदित करून आता तिने सर्वाना डबल सेलिब्रेट करण्याची संधी दिली आहे. सिंधूचे पिता पी.व्ही. रमण्णा यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजस्थामधील ‘लेक सिटी’ (तलावांचं शहर) उदयपूरमध्ये येत्या २२ डिसेंबरला हा लग्न सोहळा होईल. दोघांचंही कुटुंब बऱ्याच काळापासून एकमेकांना ओळखतं आहे. महिन्याभरापूर्वीच लग्नाचा निर्णय झाला. मात्र सिंधूचं व्यस्त वेळापत्रक पाहता, २२ डिसेंबर ही तारीख लग्नासाठी निश्चित करण्यात आली. २० डिसेंबरपासून लग्नाचे विधी सुरू होतील आणि २२ डिसेंबरला सिंधू आणि वेंकट विधींवत एकमेकांशी लग्नगाठ बांधतील, असेही तिच्या वडिलांनी सांगितले. यानंतर २४ डिसेंबरला हैदराबादमध्ये रिसेप्शन पार्टीचेही आयोजन करण्यात येणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -