Friday, May 9, 2025

महामुंबईब्रेकिंग न्यूजठाणेमहत्वाची बातमी

Avinash Jadhav : अविनाश जाधव यांचा तडकाफडकी राजीनामा का? मनसेच्या नेत्याने सांगितलं हे कारण

Avinash Jadhav : अविनाश जाधव यांचा तडकाफडकी राजीनामा का? मनसेच्या नेत्याने सांगितलं हे कारण

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि मनसे (MNS) ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी (Avinash Jadhav Resign) राजीनामा दिला आहे. अविनाश जाधव यांच्या राजीनाम्यामुळे मनसेला खिंडार पडण्याची शक्यता आहे. अविनाश जाधव यांनी अचानक राजीनामा दिल्याने चर्चांना उधाण आले आहे. अविनाश जाधव यांनी पराभवाची जबाबदारी घेत ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.


मनसेचे नेते अविनाश जाधव यांच्याकडे ठाणे आणि पालघरचे जिल्हाध्यक्ष पद आहे. अविनाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे आणि पालघर जिल्ह्यात उमेदवारांनी निवडणूका लढविल्या होत्या. ठाणे शहर मतदारसंघातून अविनाश जाधव यांनी सुद्धा निवडणूक लढविली होती. परंतु या मतदारसंघातून भाजपचे उमेदवार संजय केळकर यांनी पराभव केला होता. अविनाश जाधव हे या मतदारसंघात तिसऱ्या क्रमांकावर होते. मनसेच्या ठाणे जिल्ह्यातील इतर उमेदवारांचाही पराभव झाला होता. अखेर अविनाश जाधव यांनी ठाणे आणि पालघर जिल्हाध्यक्ष पदावरून राजिनामा दिला आहे. राजिनाम्याचे पत्र त्यांनी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिले आहे. त्यांच्या या निर्णयामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. याविषयी मनसेचे नेते राज ठाकरेंचे निकटवर्तीय संदीप देशपांडे यांनी याविषयी प्रतिक्रिया दिली आहे.



अविनाश जाधव यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे पत्र पाठवत आपला जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवाची जबाबदारी स्विकारत त्यांनी आपला राजीनामा दिला आहे. माझ्याकडून काम करताना कळत नकळत काही चूक झाली असल्यास मला माफ करावं, असंही त्यांनी पत्रात म्हटलं आहे. मात्र आता राज ठाकरे त्यांचा हा राजीनामा स्विकारतात का हे पाहण महत्त्वाचं ठरणार आहे.





हे आहे खरं कारण?


संदिप देशपांडे म्हणाले, अविनाश जाधव हे भावनिक झाले आहेत. सध्या आम्ही त्यांच्याशी बोलू, चर्चा करू.. याविषयी राज ठाकरे योग्य तो निर्णय घेतील. भावनिक होऊन त्यांनी पराभवाची जबाबदारी स्विकारत राजीनामा दिला आहे. या संदर्भात लवकरच चर्चा करण्यात येईल. अविनाश जाधव यांचा राजीनामा पक्षाने अद्याप स्विकारलेला नाही.पक्षांतर्गत बऱ्याच गोष्टी घडतात ते सध्या भावनिक झाले आहे. अविनाशने पक्षासाठी बरच काही केले आहे. लवकरच आम्ही अविनाशसोबत बोलणार आहोत.

Comments
Add Comment