Friday, January 17, 2025
HomeदेशGST कलेक्शनमुळे भरली सरकारी तिजोरी, १.८० लाख कोटींच्यावर पोहोचला आकडा

GST कलेक्शनमुळे भरली सरकारी तिजोरी, १.८० लाख कोटींच्यावर पोहोचला आकडा

मुंबई: भारतीय अर्थव्यवस्थेसाठी चांगली बातमी समोर आली आहे. नोव्हेंबर २०२४मध्ये भारताचा जीएसटी(GST) कलेक्शन ८.५ टक्क्यांनी वाढून १.८२ लाख कोटी रूपयांवर पोहोचला आहे. वाढत्या जीएसटी कलेक्शनचा अर्थ भारतीय अर्थव्यवस्थेला मजबूती आणि आर्थिक गतिविधींना वेग. अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या आकड्यांनुसार नोव्हेंबरच्या या कलेक्शनने एप्रिलपासून नोव्हेंबरर्यंत एकूण जीएसटी कलेक्शनला १४.७५ लाख कोटी रूपयांपर्यंत पोहोचला आहे.

ऑक्टोबरमध्ये झाले होते रेकॉर्ड कलेक्शन

गेल्या महिन्यात म्हणजेच ऑक्टोबर २०२४मध्ये जीएसटी कलेक्शनमध्ये ९ टक्के वाढ झाली होती. ऑक्टोबरचे एकूण कलेक्शन १.८७ लाख कोटी रूपये होते. हे आतापर्यंतचे दुसरे मोठे कलेक्शन होते.

ऑक्टोबरचे कलेक्शन

केंद्रीय जीएसटी (CGST): ३३,८२१ कोटी
राज्य जीएसटी (SGST) : ४१, ८६४ कोटी
एकीकृत जीएसटी (IGST):९९, १११ कोटी
सेस – १२,५५० कोटी

जीएसटी कलेक्शनमधील वाढ काय दाखवते?

वाढलेले जीएसटी कलेक्शन सरकारला विकास कार्यांमध्ये अधिक गुंतवणुकीची संधी देते. यामुळे रस्ते, आरोग्य आणि शिक्षणासारख्या सेवांमध्ये सुधारणा करण्यास मदत मिळते. याशिवाय उच्च जीएसटी संग्रह दाखवतो. तसेच कंपन्यांची विक्री आणि सेवांमध्ये झालेल्या वाढीचे संकेत आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -