Saturday, January 18, 2025
Homeताज्या घडामोडीPollution : विषय गंभीर; मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावली!

Pollution : विषय गंभीर; मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावली!

महाराष्ट्र नियंत्रण मंडळाचा पुढाकार; रेडी मिक्स कंक्रीट प्लांटची स्थापना

मुंबई : मुंबई शहरातील हवेची गुणवत्ता (Pollution) खालावत असून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (Maharashtra Pollution Control Board) यावर चिंता व्यक्त केली आहे. हवेची गुणवत्ता अधिक खालावत असल्याने महानगर क्षेत्रातील महापालिकेच्या हद्दीत नवीन रेडी-मिक्स काँक्रीट प्लांट उभारण्यास यापुढे परवानगी दिली जाणार नसून सुरू असलेल्या प्लांट्सना पुढील तीन महिन्यांत प्रवेश आणि निर्गमन गेट्सवर धूळ प्रतिबंधक पडदे लावणे, तसेच वाहनांच्या टायरांवर पाणी फवारणी करणे बंधनकारक असणार आहे. या नवीन नियमांचे पालन न केल्यास बँक गॅरंटी जप्त करणे किंवा प्लांट बंद करणे यासारख्या कडक कारवाईचा सामना करणार असल्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश रामदास कदम यांनी सांगितले.

महानगर क्षेत्राबाहेर, महापालिका हद्दीत नसलेल्या भागात बांधकामाजवळ उभारल्या जाणाऱ्या नवीन कॅप्टिव्ह आरएमसी प्लांटला एकूण मिळालेल्या जमिनीच्या १० टक्के भागावर उभारणे आवश्यक असणार आहे. तसेच ते संपूर्णतः सर्व बाजूंनी टिन किंवा तत्सम सामग्रीच्या बंदिस्त रचनेत असावे. यासाठी बँक गॅरंटी म्हणून १० लाख रुपये जमा करून पुढील तीन महिन्यांत हे नियम पूर्ण करावे लागतील.

Ladki Bahin Yojna : लाडकी बहीण योजना सुरूच रहाणार आणि २१०० रुपये देखिल मिळणार – सुधीर मुनगंटीवार

एमपीसीबीच्या अधिसूचनेत म्हटले आहे की, बांधकामाचे ७० टक्के काम पूर्ण झाल्यावर किंवा ताबा घेतल्यानंतर प्लांट एका महिन्यात हलवावा किंवा तोडून टाकावा लागणार आहे. मुंबई शहरातील हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस खालावत असून एक्युआय हा ११८ वर पोहोचलाय. मुंबईची हवेची गुणवत्ता हिवाळ्यात मोठ्या प्रमाणावर बिघडते. ‘वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट २०२३’ च्या नुसार, जानेवारी २०२३ मध्ये मुंबईतील पीएम २.५ पातळीमध्ये २०२२ च्या तुलनेत २३ टक्के इतकी वाढ झाली होती. यामुळे मुंबई हिवाळ्यात जगातील सर्वाधिक प्रभावित शहरांपैकी एक ठरली. यावर प्रशासनाने योग्य पावलं ऊचलणं बंधनकारक आहे. नोव्हेंबर महिन्यातील २८ तारखेला मुंबईमधील गेल्या आठ वर्षातील सर्वात कमी तापमानाची नोंद करण्यात आली होती. मुंबईमधील नीचांकी तापमान हे १६.८ अंश इतक होत याची नोंद हवामान खात्याकडून करण्यात आली. अशा प्रकारचं थंडीच वातावरण पुढील काही दिवस असणार असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला होता. या परिस्थितीनंतर मुंबईची हवेची गुणवत्ता (Pollution) सुधारण्यासाठी प्रादेशिक एअरशेड धोरणाची गरज असल्याचे अभ्यासकांनी आपलं मत मांडलं होतं.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -