Friday, January 17, 2025
Homeब्रेकिंग न्यूजOath Ceremony : मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसाठी महायुतीची जय्यत तयारी!

Oath Ceremony : मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसाठी महायुतीची जय्यत तयारी!

लाडक्या बहिणींना विशेष निमंत्रणे, ४० हजार पाहुणे, २२ राज्यांचे येणार मुख्यमंत्री

मुंबई : महायुतीचा मुख्यमंत्री (Maharashtra CM) कोण होणार? यावर अद्याप शिक्कामोर्तब झालेले नसले तरी शपथविधी ५ डिसेंबरला होणार असून त्याची जय्यत तयारी सुरु करण्यात आली आहे. आझाद मैदानात हा शपथविधी सोहळा (oath ceremony) पार पडणार आहे. या कार्यक्रमाला लाडक्या बहिणींना विशेष निमंत्रण देण्यात येणार आहे. तब्बल ४० हजार निमंत्रितांची जणांची उपस्थिती असेल, असे महायुतीच्या (Mahayuti) मंत्रालयीन सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

Ladki Bahin Yojna : लाडकी बहीण योजना सुरूच रहाणार आणि २१०० रुपये देखिल मिळणार – सुधीर मुनगंटीवार

महायुतीच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीच्या सोहळ्याचं महानियोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसाठी जवळपास ४० हजारजणांची उपस्थिती असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आणि सर्व केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत हा शपथविधी पार पडणार आहे. देशातील २२ राज्यांचे मुख्यमंत्री देखील या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. लाडक्या बहिणींना यासाठी विशेष आमंत्रण देण्यात येणार आहे. जवळपास दोन हजार व्हीव्हीआयपींच्या पासेसची यासाठी सोय करण्यात येणार आहे.

कशी असेल आसन व्यवस्था?

आझाद मैदानात (Mumbai Azad Maidan) १३ विशेष ब्लॉकमध्ये लोकांच्या बसण्याची व्यवस्था असणार आहे. यामध्ये तीन स्टेजची उभारणी केली जाणार आहे. एक मुख्य स्टेज आणि दोन त्याच्या आजूबाजूला छोट्या स्टेजची उभारणी केली जाणार आहे. विविध धर्माचे संत-महंत, भाजपशासित राज्यातील मुख्यमंत्र्यांची यात उपस्थिती असेल. संत महंतांसाठी वेगळ्या स्टेजची उभारणी केली जाणार आहे. खासदार आणि आमदारांसाठी देखील वेगळी आसनव्यवस्था केली जाणार आहे. महायुतीच्या पदाधिकाऱ्यांसाठी देखील वेगळी आसन व्यवस्था असणार आहे.

अमित शहांनी मागविले आमदारांचे रिपोर्ट कार्ड

भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने मंत्रीपदासाठी अटी जाहीर केल्या आहेत. या अटी पूर्ण करणाऱ्यांना मंत्रीपदे मिळणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंत्रिमंडळात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या आमदारांचे रिपोर्ट कार्ड मागवले आहेत. लोकसभा निवडणुकीत संबंधित आमदाराची कामगिरी कशी होती, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत संबंधित व्यक्तीने प्रामाणिकपणे काम केले का? हे पाहणे बाकी आहे. मंत्रिमंडळात इच्छूक माजी मंत्री असतील, तर महायुती सरकारच्या काळात संबंधित मंत्र्याने मंत्रालयात कशी काय सेवा केली? संबंधित व्यक्ती किती वेळ मंत्रालयात काम करत होती. महायुतीतील त्यांच्या घटक पक्षाच्या आमदारांशी मंत्र्याची वागणूक कशी होती? मंत्र्यांनी केंद्र आणि राज्याच्या निधीचे वाटप कसे केले? संबंधित मंत्री युती धोक्यात घालतील अशी परिस्थिती होती का? त्यांनी काही वादग्रस्त विधान केले होते का? या मुद्द्यांचे रिपोर्ट कार्ड घेऊन अमित शहा यांनी महायुतीच्या नेत्यांना दिल्लीत बोलावले आहे.

निर्मला सीतारामन आणि विजय रुपाणी महाराष्ट्रासाठी भाजपाचे निरीक्षक

भाजपाने गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची महाराष्ट्राचे केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. हे केंद्रीय निरीक्षक मंगळवारी राज्यात येणार असून ४ डिसेंबरला भाजपचा गटनेता निवडला जाणार आहे. भाजपच्या केंद्रीय निरीक्षकांच्या उपस्थितीत विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. त्यासाठी केंद्रीय निरीक्षक उद्या मुंबईत दाखल होतील. याकडे भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांचे डोळे लागले आहेत. दरम्यान, येथील आझाद मैदानावर सध्या शपथविधी सोहळ्याची जोरदार तयारी प्रशासनाने चालवली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -