
मुंबई : महायुती सरकारचा शपथविधी ५ डिसेंबरला आझाद मैदानावर होणार आहे. सध्या शपथविधीची जय्यत तयारी केली जात आहे. महायुतीतील भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आज आझाद मैदानावरील तयारीचा पाहणी दौरा केला. मंत्रिमंडळातील संभाव्य चेहऱ्यांची यादी घेऊन देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आज दिल्लीला जाणार आहेत. महाराष्ट्रात सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे. भाजपा विधिमंडळ पक्षाचा नेता निवडीसाठी पक्षाने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.
https://x.com/BJP4India/status/1863529795948253208