Friday, February 14, 2025
Homeताज्या घडामोडीVikrant Massey : ३७व्या वर्षी विक्रांत मॅसीचा अभिनयातून संन्यास; केली शॉकिंग पोस्ट

Vikrant Massey : ३७व्या वर्षी विक्रांत मॅसीचा अभिनयातून संन्यास; केली शॉकिंग पोस्ट

 Vikrant Massey : बॉलिवूडमधील विक्रांत मॅसी हा उत्तम अभिनेत्यांपैकी एक असून त्याने आत्तापर्यंत एकाहून एक सरस चित्रपटात उत्तम भूमिका केल्या आहेत. गेल्या काही महिन्यांपूर्वी आलेला ’12th फेल’ असो किंवा नुकतेच प्रदर्शित झालेले ‘सेक्टर 36’ आणि ‘द साबरमती रिपोर्ट’ या सर्व चित्रपटांमध्ये त्याच्या अभिनयाचं नाणं अगदी खणखणीत वाजलंय. 12th फेल या चित्रपटातील अभिनयासाठी तर विक्रांतला अनेक पुरस्कारही मिळाले. या चित्रपटानंतर त्याच नाव खूपच गाजलं. मात्र, २ डिसेंबरला विक्रांतने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली, त्यामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ती वाचून सगळेच हैराण झाले आहेत. वयाच्या ३७व्या वर्षी विक्रांत बॉलिवूडमधून संन्यास घेणार असल्याने त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. विक्रांतने अचानक हा निर्णय का घेतला त्याचं कारणही त्याने सांगितलं आहे. विक्रांतने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन त्याने अचानक बॉलिवूडमधून रिटायरमेंटचा निर्णय का घेतली, याविषयी माहिती दिलीय.

Rohit Sharma : छोट्या हिटमॅनचे नाव आले समोर!

विक्रांतचा बॉलिवूडला अलविदा

विक्रांतने सोमवारी आज पहाटे सोशल मीडियावर पोस्ट करुन आपला हा निर्णय सर्वांना सांगितला. विक्रांत म्हणाला की, “गेले काही वर्ष माझ्यासाठी फार वेगळी आणि शानदार आहेत. तुमच्या पाठिंब्यांसाठी मी सर्वांचे मनापासून आभार मानतो. परंतु मी आयुष्यात जसं पुढे जातोय तसं मला कळालं की एक पती, बाप, मुलगा आणि अभिनेता म्हणून आत्मपरिक्षण करायची गरज आहे. त्यामुळे आता पुन्हा घरी परतायची वेळ झाली आहे.” २०२५ या वर्षांत मी तुम्हाला शेवटचं भेटेन. पुन्हा योग्य वेळ जोपर्यंत येत नाही तोपर्यंत (ही शेवटची भेट असेल.) दोन शेवटचे चित्रपट आणि अगणित आठवणी, सर्व गोष्टींसाठी खूप खूप धन्यवाद ‘ असं विक्रांतने त्याच्या पोस्टमध्ये नमूद केलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vikrant Massey (@vikrantmassey)

पोस्टमुळे चाहते हैराण

दरम्यान, विक्रांतच्या या पोस्टनंतर त्यावर कमेंट्सचा अक्षरश: पाऊस पडलाय, त्याच्या या निर्णयामुळे अनेकांना धक्का बसला असून त्याचे चाहते तर हैराणच झालेत. अनेकांनी त्या पोस्टवर कमेंट करत निराशा जाहीर व्यक्त केली आहे. विक्रांतने असा निर्णय का घेतला, हे तर प्रत्येकालाच जाणून घ्यायचं आहे. तू असं का करतोयस ? तुझ्यासारखा अभिनेता क्वचितच समोर येतो, असं म्हणत एका चाहत्याने त्याला थेट सवाल विचारला आहे. हे खरं नाही, हे खरं नसाव अशी मला अशा आहे, अशा शब्दांत आणखी एका चाहत्याने त्याचं दु:ख व्यक्त केलंय.

गेल्या वर्षीच विक्रांतचा ’12वी फेल’ रिलीज झाला होता, ज्यावर लोकांनी भरभरून प्रेम दिल होत. त्यातील त्याच्या अभिनेयाचे खूप कौतुक झाले. तर नुकत्याच आलेल्या ‘द साबरमती रिपोर्ट’ या चित्रपटासाठी, त्याला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२४ मध्ये ‘पर्सनॅलिटी ऑफ द इयर’ हा पुरस्कार देण्यात आला होता.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -